फुलसावंगी येथे भगवान श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा,सर्व सण शांततेत साजरे करा:पोलीस प्रशासन महागाव पोलिसांचे आवाहन


उमरखेड तालूका प्रतिनिधी :विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )


महागांव तालुक्यातील फुलसावंगी येथे पुणेश्वर मंदिराच्या गेट जवळ सर्व फुलसावंगी परिसरातील नागरिक एकत्र जमले असता डॉ. चंदन पांडे व मुन्ना आडे पोलीस API ,महाराष्ट्र पोलीस यांनी भगवान श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यानंतर महागाव पोलीस प्रशासनाकडून होणाऱ्या श्रीरामनवमी जयंती या उत्सव मध्ये कुठल्याही प्रकारे वाद निर्माण होणार नाही यासाठी व फुलसावंगी या परिसरात शांतता कायम ठेवण्यासाठी महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पाटील साहेब. श्री मुना आडे साहेब यांचे उपस्तितीत आज 30मार्च फुलसावंगी येथे दरम्यानं मिरवणूक रस्त्याने फुलसावंगी परिसरातील नागरिकांनी शांततेत रामनवमी उत्सव व सुव्यस्थेचे पालन करून नागरिकांनी शांततेत उत्सव साजरे करण्याचे आव्हान फुलसावंगी परिसरातील नागरिकांना केले आहे .यावेळी महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पाटील साहेब,मुना आडे,API गजानन राठोड, दिनेश आडे, अमित नोळे, लवू पवार, संदीप चव्हाण उमेश टिळेवाड हे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.