
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आज दिनांक 26/11/2022 रोज शनिवारला सकाळी दहा वाजता संविधान दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य विलास निमरड सर, प्रमुख पाहुणे प्राध्यापक रंजय चौधरी सर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्ग 10 वा ब चे वर्गशिक्षक राजेश भोयर सर यांनी करून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.त्यानंतर विद्यार्थी वक्ते मयूर राजूरकर यांनी संविधानावर गीत सादर केले.त्यानंतर हर्षदा भडे, भोजराज नंदूरकर,गायत्री कुटे, तनिषा काळे,प्रज्वल रेंघे,अमृता काटकर,तक्षिका भगत,गुंजन सोनतापे, हर्षदा ठोंबरे,गुंजन भोयर,कृतिका खडसे, यांची भाषणे झाली,गीत सादर केले. विद्यार्थी वक्ते आटोपल्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक रंजय चौधरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सखोल मार्गदर्शन केले.सोबतच संविधानाचे महत्व पटवून दिले.त्यावेळी बोलताना प्राध्यापक रंजय चौधरी म्हणाले कि संविधान हाच भारतीयांचा खरा धर्म ग्रंथ असल्याचे सुतोवाच केले व आपले विचार आटोपते घेतले.कार्यक्रमाचे शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विद्यालयाचे प्राचार्य/मुख्याध्यापक विलास निमरड सर यांनी अध्यक्षीय भाषण केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सोनिया चव्हाण या विद्यार्थीनींनी केले तर आभार हर्षदा ठोंबरे हिंने मानले.या कार्यक्रमाला विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक रमेश टेंभेकर सर,श्रावनसिंग वडते सर,दिगांबर बातुलवार सर,सौ.कुंदा काळे मॅडम , सौ. वंदना वाढोणकर मॅडम ,सौ.स्वाती नैताम मॅडम मोहन आत्राम सर,मोहन बोरकर सर,विशाल मस्के सर,कु.वैशाली सातारकर मॅडम,शुभम मेश्राम सर,सौ दिपाली कोल्हे मॅडम,कु.रूचिता रोहणकर मॅडम,तथा शिक्षकेत्तर कर्मचारी पवन गिरी कनिष्ठ लिपिक, बाबूलाल येसंबरे, विनोद शेलवटे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्गशिक्षक राजेश भोयर सर यांनी अथक परिश्रम घेतले.
