
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वरणा गावातील शेतकरी गोविंदा नागो वडदे वय वर्षे अंदाजे 60 रा. वरना तालुका राळेगाव येथील असून आज सकाळी अकरा वाजता आपल्या घरच्या लोकांना शेतात जातो म्हणून निघून गेला आणि शेतातून विषारी औषध प्राशन करून घरी परत आला असता तो घरात चक्कर येऊन पडला असता घरच्या लोकांनी आजूबाजूला आवाज देऊन गावातील नागरिक यांनी त्याला ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे उपचार घेण्यासाठी दाखल करण्यात आले उपचार घेत असताना त्याचा मृत्यु झाला . शेतकरी गोविंदा वडदे यांच्या मुलानी सांगितले आहे की माझ्या वडीलाकडे काही कर्ज होते या वर्षी नापीकीमुळे कर्ज कसे फेडायचे असा विचार दररोज माझे वडील करीत होते अशी प्राथमिक माहिती मिळाली नेमकी आत्महत्या कशामुळे केली आहे या गोष्टीची माहिती राळेगाव पोलिस करीत आहे.
