
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड
माणूसच माणसाप्रमाणे वागत नसल्याने निसर्गही आता कोपला असुन यामुळे मात्र सजीव सृष्टी धोक्यात येत आहे. निंगनूर, मेट परिसरामध्ये गेल्या आठवड्यात तुरळक झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावून बहुतांशी शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या मात्र घेल्या आठ दिवसापासून पावसाने दडी मारल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली आहे .यावर्षी मान्सून महाराष्ट्रात थोडे उशिरा धडकले त्यामुळे शेतकऱ्याचे पुर्ण नियोजन बिगडले. पेरण्या लाबनिवर गेल्या आणि आता पाऊसच न पडल्याने शेतकरी चिंता ग्रस्त झाले आहे. महागाई बियाणे पण शेतात टाकली ती आता उगवेल की नाही याची शाश्वती नाही बाजारपेठ ही शेतकऱ्यावरून अवलंबून असतें जर शेतकऱ्याना वेळेत आणि योग्य उत्पादन झाले तरच बाजारपेठेत पैसा खेळत राहतो. आणि सर्व काही व्यवस्थितीत चालते यावर्षी किमान पंधरा दिवस उशिरा पेरणी झाल्याने पीक सुद्धा उशिराच निघेल यांचा फटका नकीच बाजारपेठेवर पडणार शेतकरी चिंता ग्रस्त तर आता व्यापारी सुद्धा चिंतेत जुलै महिना सुरु होऊनही आजूनही वातावरणातील आकडा कमी झाला नाही उष्णता वाढतच आहे त्यात पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी दिवसेंदिवस चिंता ग्रस्त होत आहे.
