ग्रा. पं. सदस्याला मारहाण, अश्लील भाषेत जातीवाचक शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी (आरोपीविरोधात अंतरगुन्हा दाखल)

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

राजकीय पुर्वग्रह दुषित होवुन ग्राम पंचायत सदस्याला मारहाण करून अश्लील भाषेत जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना आस्टोना येथे घडली. तक्रारी नंतर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपी विरोधात वडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असुन आरोपी फरार झाल्यामुळे पोलीस शोध घेत आहेत.
राळेगाव तालुक्यातील आष्टोना ग्राम पंचायतचे सदस्य रविंद्र कन्नाके दि. २८/०१/२०२३ रोज शनिवार ला ग्राम पंचायतची मासिक सभा संपल्यानंतर उपसरपंच, सचिव व गावकरी यांच्यासोबत गावाच्या विकासाच्या दृष्टीने चर्चा करत असतांना गावातील नाना चंपत गोखरे हा तिथे येवुन सचिव यांच्या कडे माहिती अधिकार देवुन ताबडतोब माहिती मागत होता तेव्हा कन्नाके यांनी सचिवांना आजचाच माहिती अधिकार असुन आजच माहिती देणे बंधनकारक आहे का असे म्हणल्या बरोबर नाना गोखरे याने कन्नाके यांना अश्लील भाषेत जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली यावेळी तिथे उपस्थित असलेल्या उपसरपंच, सचिव मध्यस्थी करून भांडण मिटविले परंतु दिनांक ३०/०१/२०२३ रोज सोमवार ला दुपारी अंदाजे वेळ ४ वाजता कन्नाके घरून गावात जात असतांना चौकात नाना गोखरे याने रस्त्यात आडवून अश्लिल भाषेत जातिवाचक शिवीगाळ करून तुझा कायमचाच नायनाट करून बंदोबस्त करतो गावात असणारा महाशिवरात्री उत्सवाचा काला पाहु देणार नाही अशी जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी घडलेल्या प्रकाराने घाबरलेल्या कन्नाके यांनी वडकी पोलिसात धाव घेत आपल्यावर घडलेली आपबिती कथन करून फिर्याद दाखल केली वडकी पोलिसांनी दाखल फिर्यादीवरून आरोपी नाना चंपत गोखरे याच्याविरोधात अनुसूचित जाती,जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा१९८९ कलम ३ (१) (आर), ३ (१) (स), ३(२), ५,
भारतीय दंड संहिता १८६० कलम २९४,३२३,३४१,५०६ नुसार गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील हे करीत आहेत.
या घटनेमुळे फिर्यादी व कुटुंबिय प्रचंड दहशतीत असून त्वरित कारवाई करण्याची मागणी ग्रा. प. सदस्य रवींद्र कन्नाके यांनी केली आहे.