
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील खडकी येथील शेतकऱ्यांचे तहसीलदार यांना निवेदन
सविस्तर वृत्त असे राळेगाव तालुक्यातील अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याने येथील दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत देण्याची मागणी या निवेदनामध्ये खडकी येथील शेतकरी यांनी केली आहे. सदर आपल्या खडकी गाव परिसरात तसेच आपल्या तालुक्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे अद्भुतपूर्व नुकसान झाले आहे शेतकरी वर्गांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर स्वरूपात उभा राहिला आहे बियाणे, खते, मजुरी यावर मोठ्या प्रमाणात खर्च करूनही शेतकऱ्यांच्या हाती आज काहीच आलेले नाही. सध्या शेतकऱ्यांवर कर्जबाजारीपणाचे ओझे प्रचंड वाढले आहे. शेतीमधील उत्पन्न शून्यावर आले असल्याने कुटुंबाच्या रोजच्या गरजाही भागविणे कठीण झाले आहे. अनेक शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत अशा बिकट परिस्थितीत शासनाने तात्काळ पुढाकार घेऊन दिलासा देणे अत्यावश्यक आहे बँकांचे कर्ज सावकारांचे व्याज मजुरी बियाणे खते यांचा प्रचंड बोजा अंगावर असताना हातात काहीच उत्पन्न नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे जगणेच कठीण झाले आहे ही स्थिती जर शासनाने गांभीर्याने घेतली नाही तर शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर उग्र आंदोलनाच्या मार्गावर जाण्यास भाग पाडला जाईल. असे या निवेदनात नमूद केले आहे सदर या निवेदनामध्ये शेतकऱ्यांनी प्रमुख पाच मागण्या केल्या आहेत खडकी परिसरात व तालुक्यातील प्रभावित क्षेत्रास तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावे. प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट हेक्टरी किमान पन्नास हजार रुपये मदत मंजूर करून थेट खात्यात जमा करण्यात यावी. शेतकऱ्यांचे सर्व कर्ज अल्पमुदती, मध्यम व दीर्घ मुदती, संपूर्ण माफ करण्यात यावे. पंचनाम्याची विलंबकारक पद्धत टाळून सरसकट मदत देण्यात यावी. शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी विशेष मदत पॅकेज व रोजगारांच्या हमीच्या योजना तात्काळ लागू कराव्यात असे या निवेदनात नमूद केले आहे सदर निवेदन देतेवेळी शेतकरी हेमंत वाबिटकर, योगेश तेलतुंबडे, रूपचंद बागमार, मधुकर बैलमारे, देविदास काळे, शंकरराव वाबितकर, रवींद्र येपारी, अक्षय जवादे, देविदास तेलतुंबडे, अक्षय तीलतुंबडे, राजेंद्र येपारी, श्रीधर येपारी, मंदाबाई येपारी, कविता येपारी, पुष्पा तेलतुंबडे, प्रफुल जवादे, अतुल जवादे, देविदास जवादे, वंदना बैलमारे, दिलीप काळे, अशोक वाबिटकर, देविदास खोडे, पिजबा आत्राम, संजय केराम, प्रमोद केराम, प्रवीण पढाल, रामदास पडल, नारायण पढाल, पार्वता हाते, कृष्णाकर जवादे, मंदाबाई वाबिटकर, सोनू वाबितकर, दिलीप केराम यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते
