
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शेतकरी कर्जमाफी,कृषी मालाला योग्य हमीभाव,अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत अशा विविध मागण्यांसाठी यवतमाळ शहर काँग्रेस कमिटी,तालुका काँग्रेस कमिटी,राजमुद्रा प्रतिष्ठान व शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने आज दिनांक २२ ऑगस्ट (शुक्रवार) रोजी पोळ्याच्या दिवशी शहरातील प्रसिद्ध पोळा यात्रेत भव्य निदर्शने करण्यात आली.
या निदर्शनावेळी कार्यकर्त्यांनी “शेतकऱ्याच्या मालाला द्या हमीभाव – अन्याय झाला तर करू उठाव!”, “अतिवृष्टीने झाले नुकसान – तात्काळ मदत हाच उपाय महान!”, “कर्जमाफीशिवाय नाही जगणं – शेतकरी वाचवा हेच रणांगण!”, “शेतकऱ्याला द्या जगण्याचा हक्क – अन्यायाविरुद्ध करु संघर्ष ठक्क!”, “कर्जमाफी हवी – हमीभाव हवा – शेतकऱ्याचा श्वास वाचवणं गरजेचं ठवा!” अशी जोरदार घोषणाबाजी केली.
तसेच “शेतकऱ्याचा न्याय हा आमचा श्वास!”, “कर्जमाफी नसेल तर विकास नसेल!”, “शेतकऱ्याशिवाय अन्न नाही – अन्नाशिवाय जीवन नाही!” अशा प्रभावी टॅगलाइनच्या माध्यमातून काँग्रेसने सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
या निदर्शनाचे नेतृत्व शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रा.डॉ.बबलू उर्फ अनिल देशमुख यांनी केले.दरम्यान यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब मांगुळकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी ढोक,तालुका काँग्रेस अध्यक्ष रमेश भिसणकर,माजी आरोग्य सभापती नंदू कुडमेथे,कोषाध्यक्ष ओम तिवारी,विशाल पावडे,अल्पसंख्यांक विभागाचे शहर काँग्रेसचे अध्यक्ष जाफर खान,सोशल मीडिया काँग्रेस कमिटी यवतमाळ जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके, स्नेहल रेचे,ऍड.सीमा तेलंगे,कॉम्रेड सचिन मनवर,छोटू सवाई,जुबेर सय्यद,शेतकरी आंदोलक प्रा.पंढरी पाठे,जाफर खान, किशोर बडे,शेतकरी नेते अशोक भुतडा, गंगाधर राऊत,किशोर गजभिये,मुकुंद ठाकरे,वृषभ गुल्हाने,जावेद अख्तर,जरार खान,दत्ता हाडके,गजानन नवदुर्गे,नईम पैलवान,असमत खान,इत्यादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
