

राळेगाव : दि.१ ऑगस्ट २०२३ : ” स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे नि तो मी मिळवणारच!” अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी तसेच “पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नसून ती कष्टकरी, श्रमिक, शेतमजूर, दलित यांच्या घामावर तरलेली आहे, ” म्हणणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती हे दोन्ही कार्यक्रम संस्कृती संवर्धन विद्यालयात उत्साहात साजरे झाले. यावेळी दोन्ही महान विभूतींचे प्रतिमांचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यामधून कु. पूर्वा कुसाम, वैष्णवी नान्हे, रोशनी कार्लेकर, आचल करलुके, सानिया डहाके, चांदणी मेश्राम याची समयोचित भाषणे झाली.
जान्हवी काटकर व मानसी आडे या विद्यार्थिनी साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांचे ‘ स्मशानातील सोने ‘, पाठाचे अभिवाचन केले. तर लहान मुलांसाठी दहा ओळींचा निबंध देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी येसेकर या होत्या. संचालन जेष्ठ शिक्षिका सीमा देशमुख यांनी केले. त्यावेळी त्यांनी लोकमान्य टिळकांवरील सुंदर गीत सादर केले. आभार प्रदर्शन राकेश नक्षिणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र मून, दिनकर उघडे, योगेश मिटकर, अनंता परचाके, भाग्यश्री कावळकर, प्रकाश अंबादे इत्यादी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचा-यांनी अथक परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
