
महाराष्ट्र शासनाच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले कर्जमुक्ती योजना २०१९ ला राबविण्यात आली होती. या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेअंतर्गत ५० हजाराचे अनुदान देणे बंधनकारक होते. मात्र युनियन बँक ऑफ इंडिया च्या वरोरा शाखेतील ३३ शेतकरी अजूनही लाभापासून वंचित आहेत. पात्र शेतकरी बँकेत वारंवार जाऊन मॅनेजरला विचारणा करीत आहेत. मात्र त्यांना तारीख पे तारीख दिली जात आहे.
त्या ३३ शेतकऱ्यांना तात्काळ लाभ देण्यात यावा. अन्यथा शेतकरी विरोधी बॅक म्हणून युवा सेनेतर्फे आंदोलन करून बँकेला ताळे ठोकण्यात येईल याची नोंद ध्यावी.असा इशारा मनीष जेठानी युवासेना जिल्हा प्रमुख यानी दिला.
