ठाणेदार सुजाता बनसोडे यांची धडक कारवाई तब्बल५,९९,६०० रू. चा गुटखा जप्त (गुटखा तस्करांच्या आवळल्या मुसक्या)

प्रतिनिधी:-संजय जाधव


बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत प्रथमच गुटख्या वर मोठी कार्यवाही करण्यात आली

गुटखा बंदी असतानाही बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत खुले आम गावोगवी चौका चौकात गुटखा विक्री होत होती परंतु अद्याप एवढी मोठी कार्यवाही प्रथमच बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत केल्याचे बोलले जात आहे. गुटखा कुठून येतो याची माहिती सामांन्य नागरिकाला माहित होती परंतु पोलीस स्टेशनला याचा काही पत्ता नसल्याचे आव आणून आर्थिक मलिदा लाटल्या जात होता .
बिटरगाव पोलीस स्टेशन चा सुजाता बनसोड यांनी प्रभार हाती घेताच अवैद्य दारू जुगार मटका यांनी आपले बस्तान गुंडाळले पण गुटखा तस्करी चालू होती त्याला रोखण्याचे काम नुकताच पदभार हाती घेतलेल्या बिटरगाव पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष ठाणेदार सुजाता बनसोड समोर आव्हान होते परंतु आवघड दिसणारे आव्हान अवघ्या काही दिवसातच गुटखा तस्करांवर आज सकाळी 4 वाजता गुप्त माहिती दाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हिमायतनगर येथील गुटखा तस्कर (आरोपी) अब्दुल वाजिद अब्दुल करीम वय ५० वर्षे व सय्यद अमीर सय्यद खमर वय अंदाजे ४० वर्षे हे आपल्या सोबत्या कडून ढाणकी व परिसरात गुटखा विक्रीस घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती मिळताच ठाणेदार सुजाता बनसोड व पोलीस कर्मचारी यांनी ब्राम्हणगाव ,सोईट , सोईट येथील स्मशानभूमी गावाजवळ अँटोवर धाड मारून तपासणी केली आसता प्रतिबंधात्मक गुटखा आढळून आला ऑटो चालक विक्रेता अब्दुल वाजिद अब्दुल करीम याला विचारणा केली असता हिमायतनगर येथील गुटखा विक्रेता शेख आमीर शेख खमीर यांचा असल्याचे सूतोवाच केले त्यावरून बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गुटखा प्रतिबंधक अंतर्गत अप.क्र कलम २७०,२०२३ कलम१८८,२७२,२७३, ३२८भा.द.वी.सह कलम ५९ अन्न व सुरक्षा मानदे कायदा सन२००६, २०११नियम चे २६(२)कलम२७, कलम३०(२)( अ )कलम५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे कार्यवाहीत 3 लाख 99 हाजार रुपयाचा गुटखा आणी 2 लाख रुपयांची ऑटो किंमत दोन्ही मिळून सहा लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एव्हढी मोठी कारवाही प्रथमच झाल्याचे नागरिक बोलत आहेत हिमायतनगर येथील गुटखा तस्कर हेच विदर्भ मराठवाड्यातील सर्वात मोठे गुटखा तस्कर यांच्या वर प्रथमच कार्यवाही झाल्याचे सुद्धा नागरिक बोलत आहेत
बिटरगाव पोलीस स्टेशन सारख्या ग्रामीण भागात पोलीस वाले जर लाखो रुपयांचा गुटखा पकडून कार्यवाही करत असतील तर ज्या विभागाकडे प्रतिबंधित गुटखा तस्करी थांबवण्याची जबाबदारी आहे तो विभाग कधी जागा होऊन गुटखा तस्करी थाम्बवेल अशी चर्चा नागरिक करत आहेत
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक मा.डॉ पवन कुमार बनसोड , मा.पियूष जगताप अपर पोलीस अधीक्षक, मा. पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शना खाली
ठाणेदार सुजाता बनसोड पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टेंभुर्णे पोलीस जमादार मोहन चाटे पोलीस शिपाई निलेश भालेराव पोलीस शिपाई प्रवीण जाधव पुढील तपास हे करीत आहेत.