
सहसंपादक : रामभाऊ भोयर
डॉ. य.मो. दोंदे सार्वजनिक शैक्षणिक ट्रस्टच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व प्रजासत्ताक दिनानिमित्त, सांस्कृतिक कार्यक्रमाचे औचित्य साधून माता पालक व विद्यार्थी मेळावा याचे आयोजन शाळेमध्ये करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक ना.ग. थुटे सर ,केंद्रप्रमुख सुभाष पारधी सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक धोबे सर शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी ,चहांद, परसोडा, लाडकी, मुदापूर, येवती, करंजी गावातील सर्व पालक माता, पालक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर माता पालक यांचा हळदीकुंकू व वाण वाटप कार्यक्रम पार पडला. या मेळाव्यात माता पालक पुरुष मंडळींचे विविध खेळ घेण्यात आले. उखाणे स्पर्धा, लिंबू चमचा, बटाटा रेस, संगीत खुर्ची यासारख्या स्पर्धांमध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. या स्पर्धांमध्ये विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही गावकरी व माजी विद्यार्थी यांनी शाळेला महापुरुषांचे फोटो भेट म्हणून दिले. यामध्ये राहुल पाटील, शंकर बेहरे, कवडूजी सिडाम, विजय गवाकर, विशाल गवारकर यांनी शाळेला फोटो भेटवस्तू म्हणून दिले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी माता-पालक व शिक्षक यांच्यासाठी पालकांच्या वतीने सहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन सावंत सर तर आभार प्रदर्शन माननीय दांडेकर सर यांनी केले.
