1

प्रतिनिधी:प्रवीण जोशी ,ढाणकी
दिव्यांग बांधवांची कुचंबना होऊ नये व त्यांना समाजात ताठ मानेने जगता यावे हा उद्देश शासनाचा नेहमीच राहिला त्या अनुषंगाने शासन विविध योजना दिव्यांग बांधवांसाठी चालवत असते तसंच दरवर्षी ग्रामपंचायत विशिष्ट असा निधी दिव्यांग बांधवांसाठी राखीव असतो तो अनेक ग्रामपंचायतींनी दिला नाही अशी स्फोटक चर्चा दिव्यांग बांधवांमधून ऐकायला मिळते.
ढाणकी परिसरातील अनेक ग्रामपंचायतींनी दिव्यांग बांधवांचा विशिष्ट असा राखीव निधी असतो तो अनेक ग्रामपंचायतींनी दिला नसल्याची चर्चा दिव्यांग बांधवात आहे वेळोवेळी त्यांना काही वस्तू खरेदी करावयाची असल्यास तो त्यांना द्यावयाचा असतो तसेच दिव्यांगासाठी स्वनिधीतील पाच टक्के निधी राखीव ठेवा आणि तो त्याच वर्षी दिव्यांग बांधवांसाठी खर्च करा असे आदेश ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतीला दिला आहे तसेच दिव्यांगांचा निधी वर्षभरात खर्च झाला नाही तर शिल्लक निधी पंचायत समितीत ग्रामपंचायत ने अपंग कल्याण निधीत जमा करावा किंवा वैयक्तिक लाभाच्या योजनेतील रक्कम दिव्यांगांच्या थेट खात्यात जमा करावी असा आदेश आहे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वनिधीतील पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करणे अपेक्षित असते. पण असे होताना दिसत नसून त्यामुळे दिव्यांग बांधवांची कुचंबना होताना दिसत आहे तेव्हा गटविकास अधिकारी उमरखेड यांनी याबाबत चौकशी करून दिव्यांग बांधवांना जो निधी मिळतो तो मिळून द्यावा अशी मागणी दिव्यांग बांधवांकडून होत आहे.
