पळसपुर डोल्हारी सिरपली रस्त्याच्ये काम प्रगतीपथावर,खा. हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे रस्त्याचा प्रश्न लागला मार्गी

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड

हिमायतनगर तालुक्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत पळसपुर डोल्हारी सिरपली मार्गाचे कामाला मंजुरी मिळाल्यानंतर 13मार्च2022रोजी खा.हेमंत पाटील यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ पळसपुर येथे पार पडला आहे

या कामासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन मिळून 8कोटी2लक्ष रुपये चा निधी उपलब्ध झाल्याने कामास गती मिळाली आहे
या कामावर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे उपअभियंता नांदेड
सुधीर पाटील यांच्या देखरेखीखाली काम सुरू असून काम प्रगतीपथावर असल्याचे दिसून येते आहे
हे काम चार ते पाच दिवसात डोल्हारी पर्यंत होणार असल्याचे सांगण्यात आले हे काम झाल्यावर वहातुकीला तात्पुरता दिलासा मिळत असला तरी काम लवकर व्हावे अशी नागरिकांची मागणी आहे

खा.हेमंत पाटील यांच्या सहकार्याने 12.200कि.मी रस्त्याच्या कामाचा प्रश्न प्रलंबित होता त्यांचे पाठपुराव्यामुळे पळसपुर डोल्हारी सिरपली मार्गाचा प्रश्न सुटला
हा मार्ग विदर्भ मराठवाड्याला जोडणारा इ जी क्रमांक 14 गांजेगाव मार्ग ढाणकी ला जोडला जात असल्याने ढाणकी बिटरगाव उमरखेड माहुर जाण्यासाठी व ढाणकी हिमायतनगर वाशी मार्गाने म्हैसा निर्मल बासर आंध्र प्रदेशला ला जोडला जात असल्याने प्रवाशांच्या सोयीचा होणार आहे
ह्या रस्त्याचे काम औरंगाबाद येथील सिद्दीकी यांनी घेतले असून काम युद्धपातळीवर सुरू असून कामाच्या होत असलेल्या दृष्टिकोनातून या रस्त्यावरून लवकरच महामंडळाच्या बसेसची व्यवस्था करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे