
सहसंपादक : रामभाऊ भोयर
इंदिरा गांधी कला महाविद्यालयाचा कुशल खेळाडू सुमित सातघरे याची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीच्या कबड्डी संघात निवड झाली आहे. या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांसह शिक्षक व क्रीडाप्रेमींनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा कबड्डी संघ येत्या १ ते ५ ऑक्टोबर २०२५ दरम्यान होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेत सहभागी होणार आहे. ही स्पर्धा मेडिकॅप्स विद्यापीठ, इंदूर येथे पार पडणार असून सुमित सातघरे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
या निवडीबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष, माजी शालेय शिक्षण मंत्री श्री. वसंतराव पुरके सर यांनी सुमितचे अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्य डॉ. अल्फ्रेड शेख व क्रीडा संचालक डॉ. किरण पवार यांनीही सुमितला प्रोत्साहन देत विद्यापीठाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले.सुमित सातघरेच्या या कामगिरीमुळे इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगावचे नाव पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रात गौरवाने उच्चारले जात आहे.
