बेंबळा धरणाचे पाणी सिंचनासाठी कालव्यात सोडावे: युसुफ अली सय्यद

सहसंपादक : रामभाऊ भोयर

डॉ पंजाबराव देशमुख शेतकरी संघ व बेंबळा कालवे शेतकरी संघर्ष समिती चे वतीने आज मा.तहसिलदार राळेगाव यांना, बेंबळा धरणाचे पाणी सिंचनासाठी कालव्यात सोडावे यासाठी निवेदन देण्यात आले.
रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी गहू हरभरा ज्वारी बाजरी मका ची लागवड केली आहे तसेच उन्हाळी पिकांसाठी व गुरांना पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी बेंबळा धरणाचे पाणी कालव्यात सोडणे आवश्यक आहे.धरणाचे पाणी सोडण्यासंदर्भात मा.जिल्हाधीकारी यांचे समितीला अधिकार आहे,यास्तव मा.तहसिलदार यांचे मार्फत निवेदन देण्यात आले.यावेळी डॉ पंजाबराव देशमुख शेतकरी संघ चे युसुफ अली सय्यद, बेंबळा कालवे शेतकरी संघर्ष समिती चे सुधीर जवादे पाटील, रमेश सोनेकर, विजय जुमनाके, चंद्रकांत सिडाम, संजय हामंद,प्रभुदासजी बावणे, शशांक नगराळे, दामोदर काळे,उदालक जुमनाके व अनेक शेतकरी उपस्थित होते.