
सहसंपादक : रामभाऊ भोयर
न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना +२ दत्तक ग्राम कळमनेर येथे दिनांक 19 डिसेंबर ते २६ डिसेंबर २००२३ पर्यंत अजित केलेले आहे दिनांक 22 डिसेंबर २०२३ रोजी अड रोशनी वानोडे (सौ. कामडी) यवतमाळ जिल्हा संघटक नशाबंदी महा.राज्य.यांनी महिला व्यसनमुक्ती व कायदेविषयक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. साक्षी धुमनवार प्रमुख उपस्थिती सौ पाटील सचिव ग्रा.पं. कळमनेर सरपंच नीलिमाताई राऊत, प्रा.चौधरी सर, प्रा. कामनापुरे सर,प्रा.चिकाटे ,कु.अनुष्का धुमाळ उपस्थित होते.प्रा.कामनापुरे सरांनी स्वतःनिरव्यसनी असल्याचे उत्तम फायदे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्ष भाषणात मॅडम यांनी मोबाईलचे व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. प्रा.चौधरी सर यांनी व्यसन ही समाधान लागलेली कीड आहे ते सांगून विद्यार्थ्यांनी त्यापासून दूर राहा. चांगल्या गोष्टीचा अभ्यास करा. असा संदेश दिला. एड. रोशनी वानोडे( सौ. कामडी) यांनी सर्व प्राध्यापकांना व्यसनमुक्तीची विचार पुस्तिका देऊन सर्वांचा सन्मान केला .व्यसनमुक्तीचे पोस्टर व पत्र प्रदर्शन लावण्यात आले. व्यसनमुक्तीची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचालन कु.आकांक्षा वाघ, आभाप्रदर्शन कु.उन्नती चतुष्कार हिने मांडले. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून व्यसनमुक्तीसाठी उपाय योजनेबाबत चर्चासत्र संपन्न झाले.
