
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कळंब ( तालुका प्रतिनिधी) :- दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी शेतातून बाजारात विक्रीसाठी नेण्यासाठी भाजीपाला बैलगाडीतुन घरी आणत असतांना मागुन येणाऱ्या भरघाव वाहनाने बैलगाडी ला
भिषण धडक दिली.
या बैलगाडीतुन आपल्या संपूर्ण परिवारासह घरी परतत असलेले मोठा मारोती मंदीर परीसरात प्रभाग क्रमांक 1 मधील रहिवासी रामचंद्र गुलाबराव राऊत, शोभा रामचंद्र राऊत त्यांची मुलगी व नातु हे एकुण सर्व ६ जण गंभीर जखमी झाले. बैलगाडीचा एक बैल जागेवरच ठार झाला. जखमी मध्ये गंभीर जखमी झालेले दोघे जण नागपूर येथे उपचार घेत आहेत.
जखमी रामचंद्र राऊत हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत असतात. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर.. त्यात हा भिषण अपघात.. या सर्व बाबींचा विचार करता प्रभाग क्रमांक 2 मध्ये स्थित असलेले मोठा मारोती मंदिर न्यास समिती ने सामाजिक बांधिलकी जपत राऊत कुटुंबाला 11000/- रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला.
हि मदत महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी कार्यक्रमात मोठा मारोती मंदीर न्यासाचे अध्यक्ष भाऊरावजी ओंकार, सचिव दत्तात्रय येंडे तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष निवासी नायब तहसीलदार अनंतराव बकाले व सर्व विश्वस्त तथा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 11000/- अकरा हजार रुपये रोख अपघात ग्रस्त कुटुंबाला देण्यात आले.
याप्रसंगी मोठा मारोती मंदिराचे विस्वत गजानन काळे, आनंद धोबे,बबनराव काळे, रमेश दर्वेकर,राजेंद्र येंडे यांचे सह चंद्रशेखर चांदोरे नगरसेवक तथा बांधकाम सभापती, सौ. सुनिता प्रविण निमकर नगरसेविका, रविंद्र ओंकार सेवानिवृत्त शिक्षक, ह. भ. प. तथा राष्ट्रीय कीर्तनकार दिगंबरराव गाडगे महाराज, अॕड. सोनाली चिचाटे, सामाजिक कार्यकर्ते प्रविण हजारे, महेंद्र ओंकार, प्रा. माणिक केवटे,प्रविण चंदनशिवे, उमेश पाईकराव,गणेश हजारे, चंदनm तराळे, बसवेश्वर माहुलकर, विनोद आसुटकर, कवडु मालखेडे,डोमाजी होले,देवदत्त पोलकडे,प्रशांत ओंकार महराज, अर्चना हजारे, नीलिमा हजारे, गायत्री नवाडे, निलिमा येंडे,संगिता येंडे,वृषाली ओंकार, माहुलकर ताई, उज्वला ओंकार,तेजस्विनी महेश चांदोरे,आरती भुषण चांदोरे, अनिल धोबे, संजय होले,अविनाश येंडे, गौरव काळे, सुजल येंडे, प्रज्वल काळे, स्वानंद पोलकडे, आनंद पोलकडे, प्रसाद होले, कार्तिक चांदोरे, दत्ता हेटे, आशुतोष होले, मयुर कावलकर, नयन गजबे, यश येंडे,दिपक येंडे,दिगांबर होले तथा परिसरातील नागरिक, युवा वर्ग तथा महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
