सहसंपादक : रामभाऊ भोयर
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची अमरावती विभाग कार्यशाळा यवतमाळ येथे भावे मंगल कार्यालयात रविवार, दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतिक कार्यकारिणी पदाधिकारी, अमरावती विभागातील जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, कार्यवाह तसेच यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेचे अध्यक्षपद माध्यमिक शिक्षक महामंडळ मुंबईचे सरचिटणीस व माजी शिक्षक आमदार विश्वनाथ डायगव्हाणे सर भूषविणार असून मार्गदर्शनासाठी नागपूर विभागाचे शिक्षक आमदार व संघाचे प्रांतिक सरकार्यवाह सुधाकर अडबाले सर उपस्थित राहतील.
प्रमुख अतिथी म्हणून प्रांतिक अध्यक्ष अरविंद देशमुख सर तर विशेष उपस्थिती म्हणून प्रांतिक उपाध्यक्ष रमेश काकडे सर, जयप्रकाश धोटे सर, जयदिप सोनखासकर सर व विजय ठोकळ सर राहणार आहेत. तसेच विभागीय कार्यवाह चंद्रशेखर रहांगडाले सर, बाळासाहेब गोटे सर, प्रांतिक कोषाध्यक्ष भुषण तल्हार सर, माजी प्रांतिक अध्यक्ष श्रावण बरडे सर, माजी प्रांतिक उपाध्यक्ष श्रीराम बारोटे सर, माजी विभागीय कार्यवाह जगदिश जुनगरी सर, विभागीय कार्यवाह बाबाराव कडू सर, मुरलीधर धनरे सर आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून ही माहिती विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पवन बन सर व जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे सर यांनी दिली. तर प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती संघाचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष श्रावनसिंग वडते सर यांनी प्रसिद्ध केली आहे.
