मारेगावात एकाच रात्री बारा ते पंधरा जबरी घरफोड्या, पोलिसांसोमोर मोठे आवाहन

प्रतिनीधी नितेश ताजणे वणी


वणी :- मारेगावात चोरट्यांनी एकाच रात्री बारा ते पंधरा जबर्या घर फोडल्याची घटना घडली असून संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ही घटना ता. १४ च्या मध्यरात्री पोळ्याच्या सनाचे निमित्याने मूळ गावी गेलेल्या नागरिकांच्या घरी घडली आहे. या घटनेने पोलिसांसमोर मोठे आवाहन उभे झाले आहे.
मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील शहरात काल रात्री पोरट्यांनी चांगलाच मोठा डल्ला मारल्याची चर्चा आहे.
शहरातील माधव नगरी या एकाच कॉलोनीत ८ जबरी घरफोड्या घडल्या तर इतर भात ७ जबरी घरफोड्या घडल्याची महिती आहे.
पोळ्याचा सण सर्वत्र साजरा होत असल्याने ग्रामीण भागातील शहरात वास्तव्यास आलेले नागरिक हा सण आपल्या गावात साजरा करण्यासाठी आपल्या घरादाराला कुलूप लावून आपल्या मूळगावी गेले असता याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी शहरातील १५ घरफोड्यांना अंजाम दिला आहे. या घटनेने मारेगाव पोलीस प्रशासनाची अब्रू वेशिला टांगली असून प्रचंड रोष व्यक्त होत आहे. ज्यांच्या ज्यांच्या घरफोड्या झाल्या आहे. एकूण किती लाखावर चोरट्यांनी हात साफ केला आहे याबाबत अद्याप पर्यंत कोणतीच अधिकृत माहिती नाही.