
दहेगाव वासी यांचे हाल : दहेगाव रस्त्यांची हालत खस्ता, संबंधित विभागांचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या दहेगाव या गावांचा मुख्य रस्ता नॅशनल हायवे ४४ वरून जाते पण या गावाच्या रस्त्यात जिकडे तिकडे मोठ मोठे खड्डे पडले आहे गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे परिसरातील दहा ते पंधरा गावातील नागरिक उपचारासाठी येतात त्यांना वाहन घेऊन येताना खुप त्रास होतो रुग्णवाहिकेतून एखाद्या गरोदर महिलेला नेण्यासाठी चालकाला खड्यातुन रुग्णवाहिका जोखिमने काढा लागते कारण गरोदर महीलेच बाळ दगावण्याची शकता नाकारता येत नाही गावातील लोकांना कार्यालयीन कामासाठी राळेगाव व वडकी येथे बँकेच्या कामासाठी व इतर गोष्टी साठी रोज जाणे येणे करा लागते तसेच विद्यार्थीना शाळेत रोज जाणे येणे करा लागते तर दुचाकीस्वारना व चारचाकी वाहन चालकांना बसच्या चालकाला या खड्ड्यांमुळे गाडी चालवताना तारेवरची कसरत करा लागते खड्डा चुकविता अपघात होण्याची शक्यता असते सदर रस्त्यांची अतिशय खराब व दयनीय अवस्था झालेली असल्यामुळे मोठी अडचण व नाहक त्रास सहन करावा लागत आहे एका रात्रीतून सरकार बदलु शकते तर दोन तीन वर्षांपासून खराब असलेल्या रस्त्यांची अवस्था का बदलु शकत नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे या खराब रस्त्यामुळे व मोठ्या मोठ्या खंड्या मध्ये सद्या पावसाळा चालू असल्यामुळे पाणी साचले आहे त्यामुळे खड्यांचा अंदाज कळत नाही यामुळे सर्व नागरिक दुचाकीस्वार ,चार चाकी वाहन चालक ,रुग्णवाहिका चालक, बस चालक यांना त्रास होऊन मरण यातना सहन करत आहे.
