
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शेतकऱ्यांचे सोयाबीन निघाले व ते सोयाबीन शेतकरी विक्रीसाठी मार्केटमध्ये घेऊन येत आहेत यावेळी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 3000 रुपये प्रति क्विंटल पासून दर मिळत आहे दुसरीकडे शासनाचा सोयाबीनचा हमीभाव 4890 आहे म्हणजेच शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटलमागे जवळपास दोन हजार रुपयाचे नुकसान होत आहे llllराळेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड मध्ये सध्या सोयाबीनची खरेदी सुरू आहेत दररोज दीडशे ते 200 क्विंटल सोयाबीनचा बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येत आहेत या सोयाबीनला तीन हजार रुपये ते 4000 रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे जेव्हा की शासनाचा हमीभाव 4890 रुपये आहे शासनाने मोठा गाजावाजा करून नाफेडच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेतले पण अजून पर्यंत नाफेड ची खरेदी राळेगावला सुरू झाली नाही पर्यायाने शेतकऱ्याला खुल्या बाजारामध्ये सोयाबीन विकावे लागत आहे .खुल्या बाजारामध्ये सोयाबीनचे दर हे दबावत असल्याने शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मातीमोल भाव मिळत आहे खरेदी जर शासनाने वेळेवर सुरू केली असती तर 4890 रुपये प्रति क्विंटल ने शेतकऱ्यांचे सोयाबीन विकले गेले असते मार्केटमध्ये सोयाबीन विकून शेतकऱ्यांचे जे नुकसान होत आहे या नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करत आहे यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे उत्पादन हे जेमतेम झाले काही शेतकऱ्यांना एकरी पाच क्विंटल तर काही शेतकऱ्यांना त्याहीपेक्षा कमी उत्पादन झाले. म्हणजे एकीकडे उत्पादन कमी आणि दुसरीकडे भावही कमी अशा दुहेरी कैचीत सध्या सोयाबीन उत्पादक शेतकरी सापडला आहेत सोयाबीनची काढणी तसेच मळणी करत असताना अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन ओले झाले ओले सोयाबीन शेतकरी घरी ठेवू शकत नाही असे सोयाबीन शेतकरी विकायला आणतात ज्या सोयाबीनला कवडीमोल भाव सध्या मिळत आहेत समोर दिवाळी असल्याने तसेच कापूस अजून घरी न आल्याने व पुढे हरभऱ्याची पेरणी करायची असल्याने शेतकऱ्यांना नाईला जास्तव सोयाबीन विकावे लागत आहे .मागील काही वर्षापासून सोयाबीनच्या भावामध्ये फारसे आशादायक चित्र नसल्याने शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी आणत आहेत पण या विक्रीमध्ये मात्र शेतकऱ्यांची लूट होत आहे नाफेडने वेळीच सोयाबीनची खरेदी सुरू केली असती तर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सन्मान जनक भाव मिळाला असता पण नाफेडने वेळेवर खरेदी सुरू न केल्याने शेतकऱ्यांचे क्विंटल मागे बरेच नुकसान होत आहे यामुळे नाफेड ने तात्काळ सोयाबीनची खरेदी सुरू करावी व शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे अशी मागणी शेतकरी करीत आहे.
