
सहसंपादक : रामभाऊ भोयर
जि. प. उ. प्रा शाळा गुजरी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्य. स्था. समितीचे अध्यक्ष विनोद मडावी हे होते.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक कुणाल सरोदे यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्य -कर्तृत्वाला उजाळा देणारे भाष्य केले. सत्य, अहिंसा, स्वदेशी व असहकार चळवळ, स्वातंत्र्यलढा इत्यादी महत्वाचे विषय मुलांना समजेल अशा सोप्या पद्धतीने त्यांनी मांडले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सर्व शिक्षकवृंद, विध्यार्थी यांनी प्रयत्न केले.
