
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शेतकरी संघटनेचे संस्थापक युगात्मा शरद जोशी यांनी जीर्णोद्धार केलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील प्राचीन सीता मंदिर परिसरात सीतानवमीच्या पावन पर्वावर शनिवार, १७ मे २०२४ शुक्रवार ला दुपारी १.०० वाजता स्वयंसिद्धा सीता पुरस्कार वितरण व महिला सक्षमीकरण आणी शेतकरी महिला आघाडी ची भुमिका या विषयावरील परिसंवादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ज्या महिलांनी पतीच्या निधनानंतर किंवा घटस्फोटानंतर हिंमत न हारता संयमाने विपरीत परिस्थिती व समाजव्यवस्थेशी
संघर्ष करून आपल्या पाल्यांना लवकुशांप्रमाणे पायावर उभे करून आत्मनिर्भर, समाजातील प्रतिष्ठित व सन्माननीय नागरिक म्हणून घडवले आहे, अशा
१) श्रीमती राधा जसराज केला आर्वी, जिल्हा वर्धा २) श्रीमती नंदा शालिक बुरडकर, चंद्रपूर ३) श्रीमती विठाबाई बाजीराव मून, चंद्रपूर ४) श्रीमती लता मनोहर ढवस, भेंडाळा, चंद्रपूर ५) श्रीमती पुष्पा मोहन काकडे, रावेरी जि. यवतमाळ ६) श्रीमती छाया निर्दोष पिदुरकर, गडचांदूर जि. चंद्रपूर या सहा कर्तबगार महिलांना स्वयंसिद्धा सीता पुरस्काराने गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार ऍड. वामनराव चटप तर उद्घाटक ऍड. दिनेशजी शर्मा प्रमुख अतिथी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. ललितदादा बहाळे, शेतकरी महिला आघाडीच्या प्रज्ञाताई बापट, शेतकरी महिला आघाडी नेत्या सौ.शैलाताई देशपांडे, स्वभाप प्रदेशाध्यक्ष श्री मधुसूदन हरणे, युवा आघाडी माजी अध्यक्ष श्री.सतीश दाणी, रावेरीचे सरपंच श्री राजेंद्र तेलंगे, यवतमाळ जिल्हा बँक संचालीका सौ. वर्षा तेलंगे, तहसील खरेदी विक्री संस्था संचालक श्री संदीप तेलंगे, विनोदभाऊ काकडे, यवतमाळ जिप कर्मचारी पत संस्था अध्यक्ष श्री महेश सोनेकार, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र झोटींग, रावेरी हनुमान मंदिर ट्रस्ट अध्यक्ष श्री चंद्रकांत देशमुख, शेतकरी संघटनेचे श्री नंदूभाऊं काळे, श्री वामनराव जाधव, श्री विजय निवल, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे श्री अरूणभाऊ केदार, मुकेश मासुरकर, सौ सुधाताई पावडे, रावेरी उपसरपंच श्री गजाननराव झोटींग यांचे प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना ऍड वामनराव चटप यांनी माता सीतेनी वनवासात लवकुशा ला जन्म देवून त्यांचे संस्कारित पालनपोषण करून शुरविर बनविले त्याच प्रमाणे सत्कारमूर्ती महिलांनी पतीच्या निधनानंतर सुध्दा मुलांना संस्कारित व उच्च शिक्षीत बनवून समाजात मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांचा सन्मान आज पुरस्काराने करण्यात आला. या महिलांचा आदर्श समाजाने घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
उद्घाघाटन प्रसंगी बोलताना श्री ऍड दिनेश शर्मा यांनी माता सीतेची आत्मनिर्भरता प्रत्येक महिलांनी अंगीकारावी, असे आवाहन केले. तर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री ललीतभाऊ बहाळे यांनी महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी शरद जोशींनी सांगितलेला चतूरंग शेतीच्या कार्यक्रम अंमलात आणावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ शैलाताई देशपांडे , आभारप्रदर्शन श्री मधुसूदन हरणे यांनी, संचालन सौ लीना शेंडे यांनी केले
सोहळ्याला महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शेतकरी संघटना यवतमाळ जिल्हा प्रमुख श्री राजेंद्र झोटींग, सारंग भाऊ दरणे, गणेश मुटे, खुशालराव हिवरकर, नामदेवराव काकडे, मुकेश धाडवे छोटूभाऊ काकडे, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट यांनी सहकार्य केले.
