
वंचितचे वाढते बळ प्रस्थापितांना चिंतेची बाब
वणी :- प्रहार जनशक्ती पक्ष प्रणित प्रहार दिव्यांग क्रांती शाखेच्या तालुकअध्यक्षा सौ. विनाताई ढवळे यांनी काल ता. ३ मार्च रोजी मेढोली येथील निराधार शिबिरात येऊन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन वंचित मध्ये प्रवेश केल्याने वंचितचे बळ आणखी मजबूत होत असल्याने प्रस्तापीतांमध्ये चिंतेची बाब दिसून येत आहे.
नुकत्याच काही महिन्यांपूर्वी सौ. विना ढवळे यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश घेतला होता. त्यांना प्रहार दिव्यांग क्रांती शाखेच्या तालुकअध्यक्षा म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. त्यांनी तालुक्यातील विविध गावात जाऊन अनेक दिव्यांग व्यक्तींचे दिव्यांग प्रमाणपत्र देखील बनवून दिले आहे. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहे. त्यामुळे त्यांचे तालुक्यात चांगलेच प्रभावित कार्य आहे. त्यांनी नुकतीच वंचितचे तालुकाअध्यक्ष दिलीप भोयर यांची भेट घेऊन वंचित मध्ये कार्य करण्याची इच्छा दर्शवली असता दिलीप भोयर यांनी त्याचा वंचित बहुजन आघाडी या पक्षात काल ता. ३ मार्च रोजी मेंढोली येथे वंचितच्या महिला प्रतिनिधी प्रतिमाताई मडावी यांचे हस्ते शेला टाकून त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, तालुकाउपाध्यक्ष निशिकांत पाटील, सुभाष परचाके, व इतर मान्यवर उपस्थित होते.
