
ढाणकी/ प्रवीण जोशी—
ढाणकी पासून जवळच असलेल्या मेट येथे येथे बैल पोळा हा मोठ्या उत्साहाने आणी शांततेत पार पडला माझा शेतकरी राजा आणी त्याची बैल जोडी ही वर्ष भर आजच्या दिवसाची वाट बघत असून तिथला वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा एकमेव सण अर्थात पोळा दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु, गेल्या वर्षी करोनाच्या सावटामुळे पोळा भरला नव्हता परंतू यावर्षी हा सण मेट सह आजू बाजूतील तांड्यात सर्वत्र उत्साहाने साजरा करण्यात आला.
शेतात सोने उगविण्यासाठी काबाडकष्ट करणाऱ्या आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण मेट येथे मोठया उत्साहाने आणी शांततेत पार झाला. सर्व प्रथम बैलांची योग्य ती सजावट करून पूजा करून गावातील हनुमान मंदिराला पाच फेऱ्या देऊन पोळा समाप्ती करण्यात आली तरी हा पोळा पाहण्यासाठी गावकर्यांनी गर्दी केली होती यावेळी मेटचे प्रगतिशील शेतकरी सुरेश नाईक यांनी शेतकऱ्यांना बैलाविषयी महत्त्व पटवून सांगितले आणि भांडण तंटा न करता पोळा हा सण आपण साजरा करून आपण एक विकासाचा मार्ग धरू तसेच कोणत्याही प्रकारचे व्यसन न करता कोणताही सण उत्सव साजरा झाल्यास तो अधिक उत्तम राहील असे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मेटचे प्रगतिशील शेतकरी सुरेश नाईक म्हणाले.
