पारधी बांधवांच्या वस्तीसाठी स्वतंत्र सौरऊर्जा लाईट संच बसविला

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

कीन्ही जवादे येथे पारधी बांधवांच्या वस्तीसाठी स्वतंत्र सौरऊर्जा लाईट संच बसविण्यात आला.
सुधीर जवादे सरपंच, ग्रामपंचायत कीन्ही जवादे यांनी शासनाकडे पारधी समाज वस्ती साठी २ सौरऊर्जा लाईट ची मागणी केली होती, त्यापैकी एक सौरऊर्जा लाईट मंजूर होऊन,तो बसविण्यात आला.राळेगांव तालुक्यात फक्त तीन गावांना सौरऊर्जा लाईट मंजूर झाले असून त्यातील एक कीन्ही जवादे येथे बसविण्यात आला आहे.
ग्रामपंचायत उपसरपंच रमेश तलांडे सदस्य प्रसाद निकुरे प्रतिभाताई मोहुर्ले सुषमाताई जवादे सिमाताई ऊईके मालाताई लोणबले सचीव सुनील येंगडे, कर्मचारी पुंडलिकराव लोणबले मारुती ईठाळे , धनराज तोडसाम,राष्ट्रपाल पवार,राजु घोसले, विठ्ठलराव सिडाम,शुभम कोवे,उमेश पेंदोर यांनी व समस्त नागरिकांनी या विकासकामाचे स्वागत केले.