
वणी ते झरी मुख्य रस्तावरील जामणी लगत येत असलेला पुल हा जीर्ण झालेला असुन पाऊस काळात दळवळणासाठी अडचणी निर्माण करणारा आहे,गेल्या असेल दिवसांन पासुन प्रशासनाला व शासनाला हि बाब लक्षात आणुन देऊन देखील प्रशासनाच व शासनाच याकडे दुर्लक्ष आहे.अनेक वेळा निवदन देऊन देखील या विषयाला काणाडोळ करण्याच काम शासनाने व प्रशासनाने केले या विरोधात दि.२५ ऑक्टोंबर २०२१ रोजी तहसिल कार्यालय झरी येथे बेमुदत आमरण उपोषण करण्यात आलं प्रशासनाने या उपोषणाची दखल घेत हिवाळी अर्थसंकल्पिय अधिवेशनात हा मुद्दा टाकुन त्यावर निधी मुंजुरात करुन घेण्यात येईल,असे सांगितले असता उपोषण सोडण्यात आहे.व नंतर या पुलाच्या बांधकामासाठी महाविकास आघाडी सरकार च्या काळात दि.२३/०२/२०२२ रोजी १,९०,००,००० रुपये ऐवढा निधी मंजुर देखील करण्यात आला पण निधी मंजुर होऊन १ वर्ष १ महिना उलटुन गेला पण अद्यापही भुमीपुजन व बांधकामाला सुरुवात करण्यात आलेली नाही.प्रशासनाला व शासनाना विनंती आहे की या पुला अवस्था अत्यंत जंभीर असुन जिवघेणी आहे,जर लवकरात लवकर या पुलाच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली नाही तर प्रशासनाच्या व शासनाच्या विरोधात मोठ जन आंदोलन निर्माण करण्यात येशील आणि याच्याशी जबाबदार हे प्रशासन व शासन असेल.
तरी आमच्या निवदेनाला मान देऊन लवकरात लवकर या बांधकामास सुरूवात करण्यात यावी हि आग्रहाची विनंत अशा आशयाचे निवेदन बांधकाम विभागाला तहसिलदार मार्फेत देण्यात आले.यावेळी वैभव मोहितकार,अविनाश सोयाम,दत्ता परचाके,अनिकेत लेनगुळे,राकेश गालेवार,अतूल पाटिल,सचिन मडताम,प्रतिक तेलंग आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
