्

सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यात जल जीवन मिशन योजनेची कामे खूप दिरंगाईने सुरू असून अनेक ठिकाणी ती योजना पूर्णत्वास गेल्याची असल्याची माहिती असून त्या पैकी कोची हे गाव आहे की इथले काम पूर्ण झाले असून पाणी सुद्धा पिण्यासाठी सुरू करण्यात आले आहे.परंतु हे पाणी नळाला येत असतांना गढूळ आणि दुषित येत असल्याने हे पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याचे गावकऱ्यांना लक्षात आले तेव्हा गावातील मंडळींनी पाणी शिशीत सत्ताधारी पक्षाचे राळेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार प्राचार्य अशोक ऊईके यांच्या समोर कार्यकर्त्यांच्या समक्ष ठेवले आणि हे पाणी आम्ही पित आहे तुम्ही पण प्या असा आग्रह धरला असतांना त्यांनी ते पाणी पिण्यासाठी टाळाटाळ केली आणि त्या समस्येचे रोखठोक उत्तर देण्यास टाळाटाळ केली. या जलजीवन मिशन योजनेची कामे सांभाळणारे पाणी पुरवठा अधिकारी हे गेडाम असल्याचे म्हटले जात असून ते प्राचार्य डॉ अशोक ऊईके यांचे नातलग किंवा जवळचे असल्याचे बोलले जात असून कामाची पाहिजे त्या पद्धतीने उत्कृष्ट कामगिरी झाली नसेल तर त्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी कोचीवासियांनी हेका धरला असून नळयोजनाची ताबडतोब दुरुस्ती करून देण्यात यावी या प्ररकणाची तालुक्यात चर्चा झाली असून ज्या ज्या गावात जलजीवन मिशन योजनेची कामे सुरू आहे,कारेगावात सुद्धा या योजनेअंतर्गत खड्डे करून ठेवले असून कारेगाववासियांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यांच्या सुद्धा मनात भितीचे वातावरण निर्माण झाले असून कोची गावातील तक्रारकर्ते हे सुद्धा सरांच्या अतिशय जवळचे असून आता प्रश्न हाच आहे की आमदार साहेब ऐकतात कुणाचे.या प्रकरणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंत पुरके यांनी सुद्धा कोची गावाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून वरीष्ठ अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा केल्यानंतर हा विषय गंभीर झाला असून संपूर्ण राळेगाव तालुक्यात जल जीवन मिशन कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करणार काय? असे तालुक्यात बोलल्या जात आहे त्या वादग्रस्ता अधिकारी यांची आमदार महोदय बदली करुण त्यांच्या कामाची चौकशी लावणार काय? अशाप्रकारच्या आपलं तुपलं, नातं गोतं करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपली जागा दाखविली पाहिजे अशी चर्चा तालुक्यातील मतदारांमध्ये ऐकायला मिळते. आता आपल्याला हेच बघायचे मतदार की नातलग.
