आकाश भोयर यांची युवासेनेच्या उपजिल्हाधिकारी पदी फेरनिवड,युवासेनेची कार्यकारिणी जाहीर

1

प्रतिनिधी:संजय अतकरी,कुही

कुही ता प्र :-नुकतीच मातोश्री मुंबई वरून शिवसेनेच्या युवासेनेची रामटेक लोकसभेतील पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर झाली आहेत. यात तालुक्यातील युवा नेते आकाश भोयर हे नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी होऊन जनतेच्या कामात सहभागी होहून त्यांच्या अडी अडचणी निर्माण झालेल्या सोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वात समोर राहून अपंग,निराधार, शेतकरी, बेरोजगार हक्कासाठी लढा देत असताना त्यांना न्याय मिळत पर्यंत झटणारे यांच्या कार्याची दखल घेत पुन्हा एकदा पक्षातर्फे त्यांची उपजिल्हा युवा जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर शुभम चक्रधरे (उमरेड विधानसभा चिटणीस), प्रतीक किंदरले ( तालुका युवा अधिकारी) सुमित डेंगे( तालुका समनव्यक), श्रीधर काकोटे(तालुका चिटणीस) आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.

नवं नियुक्त पदाधिकऱ्यांचे स्वागत केले जात असून पक्षाने दिलेली जबाबदारी निस्वार्थ पणे स्वीकारणार असून पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचे सांगितले आहे.