
भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री. बंडूजी नैताम यांनी केली होती मागणी
पोंभूर्णा तालुका प्रतिनीधी:- आशिष एफ. नैताम
पोंभूर्णा तालुक्यातील बोर्डा बोरकर या गावालगत मामातलाव असून येथे मागील काही वर्षांपूर्वी मातीकाम करण्यात आले होते तेव्हा तलावावरील तुरुंब तोडले गेले त्यावेळेस संबंधीत कंत्राटदारानी त्या तुरुंबाचे बांधकाम करून देणार असे सांगीतले मात्र इतके वर्ष लोटूनही तलावावरील तुरुंबाचे काम पूर्ण झाले नाही याचा नाहक त्रास येथील शेतकर्यांना होत असुन या तलावावर तुरुंब बांधकाम करण्यात यावे अशी मागणी भाजपाचे जेष्ट कार्यकर्ते श्री. बंडूजी नैताम यांनी जि.प. चंद्रपूरचे माजी सदस्य श्री. राहुलभाऊ संतोषवार यांच्याकडे केली होती. या मागणीचे गांर्भीय लक्षात घेऊन राहुलभाऊ संतोषवार यांनी जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रियंका रायपूरे यांना बोर्डा बोरकर येथील मामा तलावावरील अडचणी सांगीतले असता संबधीत अधिकारी यांनी बोर्डा बोरकर येथील तलावाची पाहणी व चौकशी करून पूढील प्रस्तावात लवकरात लवकर या तलावावर तुरुंबाचे काम केले जाणर असे आश्वस्त केले यावेळेस जि.प.चे माजी सदस्य श्री. राहुलभाऊ संतोषवार, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रियंका रायपूरे मॅडम, अभियंता श्री सदार साहेब,भाजपाचे जेष्ट कार्यकर्ते बंडूजी नैताम, सामाजीक कार्यकर्ते आशिष नैताम, जैराम नैताम, रविंद्र नैताम, अनिल नैताम तथा गावातील नागरीक उपस्थित होते
