
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महाराष्ट्र सरकारने दिनांक 15 मार्च 2024 च्या संचमान्यते संदर्भात शिक्षकांवर अन्याय करणाऱ्या शासन निर्णयाविरोधात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन केले सभागृहात पावसाळी अधिवेशनात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह व शिक्षक आमदार सुधाकर अडबाले सर यांनी या प्रश्नावर ताराकिंत प्रश्न क्रमांक 23453 नुसार सभागृहात चर्चा घडवून आणली या तारांकित प्रश्नावर झालेल्या चर्चेत उत्तर देताना शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी या संदर्भात संबंधित शिक्षक आमदाराची सभा घेऊन अन्यायकारक बाबी शासन निर्णयांमध्ये दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने दिनांक 6 आगष्ट रोजी 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी सभा घेतली पण त्यामध्ये शिक्षक आमदार सुधाकर अडबाले सर यांना जाणिवपूर्वक बोलावण्यात आले नाही. शिक्षक आमदार सुधाकर अडबाले सर हे सतत शिक्षकांच्या मागण्या, समस्या सोडविण्यासाठी सत्ताधाऱ्यांना डबघाईस आणत असल्याने या एका जबाबदार प्रतिनिधीना हेतुपुरस्सर टाळल्याचे लक्षात आल्यानंतर शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहून दिनांक 7/8/2024 रोजी शिक्षणाधिकारी यवतमाळ येथे या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.त्या संबंधित निवेदन उपशिक्षणाधिकारी गुंडे साहेब यांना देण्यात आले त्यावेळी प्रांतिक अध्यक्ष अरविंद देशमुख, माजी विभागिय कार्यवाह मुरलीधर धनरे,यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पवन बन, जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे कार्याध्यक्ष विजय खरोडे, आनंद मेश्राम, मनोज जिरापुरे, ज्ञानेश्वर गायकवाड,श्रिकांत अंदुरकर, गुलाब सोनोने, ज्ञानेश्वर मुरखे यांच्या सह अनेक विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित असल्याचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष श्रावनसिंग वडते सर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
