सर्वोदय विद्यालयात पक्ष्यासाठी पाणी व चाऱ्याची व्यवस्था

सहसंपादक -रामभाऊ भोयर

राळेगाव प. स. अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा येथे उन्हाची तीव्रता लक्षात घेता शाळेतील हरितसेना प्रभारी श्री व्ही. एन. लोडे यांच्या पुढाकाराने विद्यार्थी व शिक्षक यांच्या सहकार्याने शाळेच्या परिसरात पाच ते सहा ठिकाणी पाणी व चाऱ्याचे पॉट लावण्यात आले . हि शाळा विविध प्रकारच्या झाडे व फुलझाडे यांनी बहरली असल्याने तेथे सदैव पक्षांची वर्दळ असते त्यामुळे वरील उपक्रमाचा पक्षी वाचवण्यासाठी फायदा होईल असे मत शाळेचे मुख्याध्यापक श्री टी. झेड. माथनकर यांनी व्यक्त केले. सदर उपक्रमाला सह. शिक्षक श्री. पि. पि. आसुटकर, आर. एस. वाघमारे, सी. डबल्यु. मोडक तसेच श्री बी. बी. कामडी, वी. टी. दूमोरे, एस. एम. बावणे, एस. वाय. भोयर यांचे सहकार्य लाभले.