
बैलाच्या खुराने शेती केली की घरात खोऱ्याने समृद्धी येथे असं मानणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि काळ्या मातीत राबराब राबवून हिरवं सोनं पिकवणाऱ्या बैलांचा अर्थात वृषभराजांचा सण पोळा हा सण दिं.१४ सप्टेंबर २०२३ रोज गुरुवार ला सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला मात्र सण साजरा होत असताना बैलांची संख्या कमालीची घटली असल्याचे दिसून आले आहे.
कष्टशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही असे यापूर्वी मानले जात होते मात्र काळ बदलला तसा शेतीचे क्षेत्रही बदलले यांत्रिक व आधुनिक पद्धतीने शेतीचा अवलंब शेतकऱ्यांनी केला ती परंपरागत पद्धतीच्या शेतीपेक्षा आधुनिक पद्धतीच्या शेतीमुळे अधिक फायद्याची ठरली पर्यायाने शेतात बैलाऐवजी ट्रॅक्टरच्या वापरावर अधिक भर सध्या स्थितीत दिसला जात आहे त्याच्या या नोंदीनुसार केवळ एका गावातील बैलजोडीच्या संखेत झालेले घट प्रचंड प्रमाणावर अचिंबित करणारे असून त्यातील आकडेवारी पाहता संपूर्ण राज्यातून खुंट्यावर बैल जोडी असावीच ही शेतकऱ्याची संज्ञा देखील लवकरच पूसल्या जाण्याची शक्यता आहे
