

वणी : प्रतिनिधी नितेश ताजणे
सोमवार 4 सप्टेंबर ला प्रतिष्ठित उद्योजक तथा जनसेवक विजय चोरडिया यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरात “मुझे चढ गया भगवा रंग” फेम प्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांचा वणीमध्ये पहिल्यांदाच सदाबहार भक्ती गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.
सायंकाळी ६ ते रात्री १० पर्यंत भजनसंध्याचे आयोजन करण्यात आले होते. हा अविस्मरणीय जल्लोष संपूर्ण आनंददायी, भक्तिमय क्षण वणीकरांनी आपापल्या कॅमेऱ्यातही टिपला. या जन्मदिन निमित्ताने अख्तर यांच्या गाजलेले भजन त्यांच्याच सुमधुर आवाजातून प्रेक्षकांनि आनंद घेत थेट ऐकले. या भजनसंध्या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवार व हजारोंच्या संख्येने भजनप्रेमींची उपस्थिती पाहायला मिळाली होती. दरम्यान रामभक्तांनी या भजन संध्याचा भक्तीमय वातावरणात उत्स्फूर्तपणे आनंद घेत जल्लोष साजरा केला.
सोमवार (ता.4) सप्टेंबर ला सायंकाळी येथील शासकीय मैदान, पाण्याच्या टाकी जवळ भजन गायिका शहनाज अख्तर यांचा सदाबहार भक्ती गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्रावणात असंख्य रामभक्तांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला. वणी विधानसभा क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्याचा वारसा जपत जनसेवक विजयबाबू चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यांच्या अभिष्टचिंतन निमित्ताने श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव समिती व विजय चोरडिया मित्र परिवाराच्या विद्यमाने मा.विजयबाबू चोरडिया भाजपा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांच्या सुमधुर भक्ती गीतांचा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी येथील शासकीय मैदान, पाण्याच्या टाकी जवळ आयोजन करण्यात आला. या करायक्रमाला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवून भजन संध्याचा आनंद घेत वाढदिवसाचा जल्लोष साजरा केला, यावेळी अनेकांनी सामाजिक कार्यकर्ता विजयबाबू यांना निरोगी,दीर्घायुष्याच्या शुभेच्छा सह प्रार्थना केल्या. श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव समिती, बजरंग दल व विश्वहिंदू परिषद तसेच विजय चोरडिया मित्र परिवार यांनी उपस्थित सर्व जनतेचे आभार मानले.
