

वणी : प्रतिनिधी नितेश ताजणे
विजयभाऊ चोरडिया यांची सामाजिक बांधिलकीशी जोडलेलं नातं समजाव अशी त्यांची ओळख मानवी हिताच्या दृष्टिकोनातून सामाजिक उपक्रम राबविणारे विजय चोरडिया यांचा येत्या ४ सप्टेंबरला वाढदिवस साजरा होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कायर, मारेगाव, वणी, अशा ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहे.या शिबिरात अनेक गरजु लोकांनी या शिबिरात सहभाग घेतला. विजय चोरडिया यांनी नेहमीच सामाजिक उत्तरदायित्व जोपासलं आहे. त्यांनी सर्वसामान्यांना सर्वोतपरी मदतीचा हात दिला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची निगा राखण्याचा त्यांनी विडाच उचलला आहे.
नागरिकांच्या काळजीपोटी त्यांनी वेळोवेळी आरोग्य शिबिरं घेऊन जनसेवेचं व्रत जोपासलं आहे.. नागरिकांच्या अनेक गंभीर आजारांचा खर्च त्यांनी उचलला आहे. जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीच्या सौजन्यायने व त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावेळीही त्यांनी सामाजिक उपक्रमांचा वारसा जपला आहे. ३१ ऑगस्टला मारेगाव येथील सुविधा मंगल कार्यालय येथे व १ सप्टेंबरला कोळी समाज भवन कायर येथे धवल नेत्रालय नागपूर यांच्या सहकार्याने भव्य नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आलं. तर आज २ सप्टेंबरला जैताई मंदिर वणी येथे कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम यांच्या सहकार्याने हे भव्य शिबीर घेण्यात आलं आहे. या तीनही शिबिरांचा रुग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. उद्या ३ सप्टेंबरला अमृत भवन वणी येथे लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी प्रदर्शनी व आनंद मेळा देखील आयोजित करण्यात आला आहे. दुपारी २ वाजता पासून तर सायं. ६ वाजेपर्यंत लहान मुलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येतील, तर रात्री ९ वाजे पर्यंत प्रदर्शनी व आनंद मेळा राहणार आहे.
सोमवारी ४ सप्टेंबरला प्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांचा सदाबहार भक्ती गीतांचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ६ ते रात्री १० पर्यंत भजन संध्या अंतर्गत गाजलेली गायिका शहनाज अख्तर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार आहे. त्यांची गाजलेली गाणी त्यांच्या सुमधुर आवाजातून प्रत्येक्षात प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविण्याचे आव्हान विजय चोरडिया यांनी केले आहे. जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती वणीच्या सौजन्यायने व सामाजिक पुढारी विजय चोरडिया यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ३१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर पर्यंत सतत सहा दिवस सामाजिक उपक्रम व भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यातील काही उपक्रम नागरिकांच्या भव्य प्रतिसादात पार पडले असून यानंतरच्या कार्यक्रमांनाही नागरिकांनी असाच प्रतिसाद देण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे
