

(वार्तांकन / प्रतिनिधी )
राळेगाव : दि. २६ जानेवारी (स्थानिक) येथील संस्कृती संवर्धन विद्यालयात शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी येसेकर यांचे हस्ते ध्वज फडकवून मानवंदना देण्यात आली. त्यावेळी पंचायत समिती राळेगावच्या माजी उपसभापती तथा कर्तबगार महिला शेतकरी श्रीमती शीलाताई सलाम ह्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी संविधानाचे प्रास्ताविक तसेच समतेची शपथ घेण्यात आली..विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केली. रोशनी कार्लेकर तथा आयुष वासेकर यांची प्रजासत्ताक दिनावर भाषणे झाली.दरवर्षीप्रमाणे तहसील कार्यालय, राळेगाव येथे आयोजित शासकीय ध्वजवंदनानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात कु. मयुरी मडावी, जान्हवी काटकर, रोशनी कार्लेकर,पुनम बारेकर, सलोनी मोहिते, दीक्षा नान्हे, वैष्णवी नागमोते,तनुश्री धनवीज,स्नेहा सोनटक्के, मानसी आडे ह्या विद्यार्थिनींनी कोळीनृत्य सादर केले. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन व मुलांना खाऊ वाटप झाले. सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन शिक्षक योगेश मिटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सीमा देशमुख, दिनकर उघडे, देवेंद्र मून, राकेश नक्षिणे, ज्ञानेश्वरी आत्राम, सलमा कुरेशी, मुकुंद मानकर, भाग्यश्री काळे, विलास ठाकरे, अनंता परचाके, देवेंद्र मून, यांनी प्रयत्न केले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून सलाम यांनी, शाळेबद्दल तसेच गुरुजनांविषयी गौरवोद्गार काढले. आपण याच शाळेत शिकलेलो असल्याचा अभिमानही व्यक्त केला. यावेळी विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करीत त्यांचे स्वागत केले.ध्वजारोहन समारंभाला सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
