
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव प स अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा येथे राष्ट्रीय हरित सेने मार्फत दि 1ते 7ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यात रोज विविध स्पर्धा घेण्यात आल्या निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले. सदर स्पर्धेचा मुख्य विषय वन्यजीव महत्त्व व त्यांचे संरक्षण व संवर्धन हा होता. उत्कृष्ट स्पर्धकांना मुख्याध्यापक श्री टी झेड माथनकर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. एक दिवस राळेगाव येथील वनीकरण विभागाचे श्री सरनाईक साहेब आणि श्री नसकरी साहेब यांनी भेट देऊन पाहणी केली.वरील उपक्रम यशस्वीतेसाठी हरित्सेना प्रभारी श्री व्ही एन लोडे पि पी आसुटकर आर एस वाघमारे टी बी लील्हारे बी बी कामडी व्हि टी दुमोरे एस एम बावणे एस वाय भोयर यांनी परिश्रम घेतले.
