
तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
उत्कर्ष शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ पुनम ताई शेंडे सचिव सौ संगीता ताई टीप्रमवार यांच्या संयोगाने,महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा आयोजित व जिल्हा उद्योग केंद्र यवतमाळ पुरस्कृत राळेगाव येथे सर्वसाधारण (GEN) प्रवर्गातील युवती व महिला व पुरुषांकरिता अन्न प्रक्रीया प्रशिक्षण कार्यक्रम राळेगाव शाखेचे थाटात उद्घाटन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य निःशुल्क,विद्या वेतन आणि त्याच सोबत प्रशिक्षणार्थी साठी गृहद्योग(मशनरी) सुरु करण्यासाठी वीस लाखांपासुन तर पन्नास लाखांपर्यंत लोण ची ही व्यवस्था.ह्या प्रशिक्षणासाठी मोठ्या संख्येने होतकरु,गरजु,महिलांनी प्रवेश घेतला आहे.ह्या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे जिल्हा उद्योग केंद्र यवतमाळ ,प्रकल्प अधिकारी रुपेशजी हिरुळकर,जिल्हा यवतमाळ उद्योग निरक्षक बापुराव वायकुडे,राळेगाव नगर पंचायतचे उपाध्यक्ष जानरावजी गिरी,नगर सेवक,मार्कण्डेय कॉलेजचे संस्थापक संतोषजी कोकुलवार,सामाजिक कार्यकर्ते राज वर्मा,सोसायटी अध्यक्ष सचिनजी हुरंकुडे कार्यक्रमाचे प्रस्ताव संकल्प फांउडेशनचे संस्थापक प्रलयजी टिप्रमवार,सौ.संगिताताई टिप्रमवार , उत्कर्ष उद्योग प्रशिक्षण केद्राचे ट्रेनर सौ.पुनमताई शेंडे राळेगाव येथे शाखेचे आयोजन संजयजी पोपट,सौ.शैलाताई नाकतोडे,वर्षाताई ताडेराव,सौ.वंदनाताई खुनकर,सौ.संतोषीताई वर्मा…. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.पुनमताई शेंडे तर आभार प्रदर्शन प्रलयजी टिप्रमवार ह्यानी केले.ह्या कार्यक्रमासाठी तसेच समाज कार्यात अग्रेसर व्यक्ती सौ.संतोषीताई वर्मा ह्यांचे शॉल,पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आले.
