कोप्रा(खू) येथील युवा शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्त्या


प्रतिनिधी::यवतमाळ
प्रवीण जोशी


बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत कोप्रा येथील सिद्धेश्वर रामराव शिरगिरे वय ४० वर्ष यांनी स्वतःच्या वडिलोपार्जित शेतात गळफास घेऊन दिनांक १९ रोजी सायंकाळी ८ वाजता आत्महत्त्या केली.
सिद्धेश्वर हा दररोज प्रमाणे मजुराला घेऊन शेतात गेला होता दिवस भर कामकरून सायंकाळी मजुरांचे पैसे देऊन तुम्ही पुढे जा मी राहिलेले काम करून येतो असे सांगितले त्यामुळे मजूर घराकडे आले रात्रीचे ८ वाजता आले तरी पण सिद्धेश्वर घरी आला नाही म्हणून चुलत भाऊ याने गावातील मित्राना विचारपूस केली मात्र सिद्धेशवर कुठेच आढळून आला नाही शेतात काम केलेल्या मजुरांनी सिद्धेश्वर हा आमच्या सोबत आला नाही तुम्ही पुढे व्हा मी मागून येतो असे सांगितले त्यामुळे एकवेळ शेतात जाऊन पाहूत असे म्हणून सिद्धेश्वर चा चुलत भाऊ आणी मजूर पाहण्यास गेले आसता सिद्धेश्वर हा गोठ्यात गळफास घेतल्याचे दिसला घटनेची माहिती पोलीस पाटील यांना कळताच त्यांनी बिटरगाव(बू) पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रताप भोस यांना सांगितली त्यावरून ठाणेदार यांनी बिट. जमादार गजानन खरात पोलीस शिपाई संतोष मुंडे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह ढाणकी आरोग्य केंद्रातील शवगृहात आणून दिनांक२० जून रोजी मृतदेहावर डॉ. स्वाती मुनेश्वर यांनी शवविच्छेदन केले कोप्रा(खू) या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले
सिद्धेश्वर यांच्यावर सोसायटी, बचतगट, वडिलांच्या ऑपरेशन करीता उधारीवर घेतलेले लाखो रुपयेयाची परतफेड कशी करावी याच विवंचनेत समोर पीकपाणी घेण्यासाठी खरेदी करावी लागणारी बी बियाणे खते कशी करावी पैसे कुठून आणावे याच विवनचनेत त्याने अखेर आपले जीवन गळफास घेऊन संपविले
सिद्धेश्वर याच्या मागे आई वडील एक मुलगा एक मुलगी आसा परिवार आहे
पुढील तपास ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनात बिट जमादार गजानन खरात पोलीस शिपाई संतोष मुंडे करत आहेत.