ढाणकी शहरातील मल्टीस्टेट पतसंस्थांच्या ठिकाणी ग्राहकांचा ठेव ठेवीचा ओघमंदावला रक्कम काढण्याकडे कल.अधिक व्याज देणारे ठिकाणे काही दिवसात होऊ शकतात कोरडी ठाक ?



कमावलेली कष्टाची रक्कम ज्या ठिकाणी गुंतवणूक केल्यानंतर ती रक्कम सुरक्षित आहे का नाही हे बघणे आता अगत्याचे बनले आहे. बीड जिल्ह्यातील दरोडेखोरांची पातळयंत्री मायावी वेशधारी यंत्रणा आपल्याकडे सक्रिय झाली असताना “ढवळ्याच्या शेजारी पवळा बांधला वाण नाही पण गुण लागला” अशी स्थिती ढाणकी शहरातील मल्टीस्टेट पतसंस्थांची झालेली आहे. सुशिक्षित बेरोजगारांनी काहीतरी हाताला काम लागेल म्हणून आर डी एजन्सी घेतली त्यांनी सुद्धा ठेव ठेवली तेही बुडवली त्यांचा कधी विचार पतसंस्था चालकांनी केला??काही तरुणांनी तर दागिने विकून या कामासाठी रक्कम जमविल्याचे कळते

ग्राहकाची लाखोंची रक्कम असून त्यांना स्वतःच्या रक्कमेशाठी दहा हजार पाच हजारांसाठी मोहताज व्हावे लागते. त्यामुळे ग्राहकांना दरोडेखोर मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या दारा पुढे रांगते उभे राहावे लागत आहे. प्रश्न असा उभा टाकतो ग्राहकाला तुमची रक्कम सुरक्षित आहे हे सांगून ठेव ठेवून घेणारे चेलेचपाटे संचालक ग्राहकांना दिलेले वचन असेच पाळणार काय??
ग्राहकाकडून मोठ्या रक्कमेच्या ठेवीच्या स्वरूपात वसूल केलेल्या रकमेमुळे डोळे दिपून गेले असावे व भांबावल्या गेले असतील मल्टीस्टेटवाले आणि इतर भ्रष्ट असलेले पतसंस्था वाले लुटारु ठरले. स्थानिक चेल्या चपाट्याचा ऐतबार राखून सर्वसामान्य गुंतवणूक करतात अनेक जणांनी ग्राहकासोबत बेईमानी केली पण ग्राहक मात्र न मागता सुद्धा माफी देतो तर खऱ्या अर्थाने ग्राहक राजा म्हणावे लागेल कोणत्याही ठिकाणी सर्वसामान्यां जनतेची रक्कम मल्टीस्टेट वाल्यांनी गुंतवनुक करण्या आधी ही रक्कम आपली नसून ती ग्राहकाची आहे असा विचार केला कधी?? लाखो रुपये जमून लुटीचा राजा होणे शक्य आहे पण आजकाल प्रामाणिकपणाचा महामेरू होणे कठीण बनले आहे.
ढाणकी शहरातील आरडी एजंट पळून गेल्यानंतर पतसंस्थेच्या एकाही जबाबदारी व्यक्तीने ग्राहका प्रति सहानुभूती सुद्धा व्यक्त केली नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असताना जीवामर्जी असेल तर छाती करून स्वतःच्या जबाबदारीवर साफ साफ बोलायला पाहिजे होत. ऐकू तरी दया यांची रांगडी जबान ग्राहकांना गुंतवणूकदारांना.
सर्व सामान्यांच्या रकमेवर सत्ता मिळून दुसऱ्याच्या रकमेत नाक खुपसणे व ढवळाढवळ करणे ग्राहक राजाला मुळीच रुचणार नाही अमर्याद संपत्ती जमवलेल्या गोटालाही ते पचणार नाही मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मधील एजंट पळून गेल्यानंतर अनेकांच्या रकमेची तफावत असल्याचे पुढे येत असताना काही परपोषी व मल्टीस्टेट या विषारी दंश करणाऱ्या यंत्रणेवर आपली स्वार्थी भूमिका बजावत असताना सकारात्मक लिहिले पाहिजे असे सांगतात . पण मल्टीस्टेट पतसंस्थेवाल्यांनी कधी चार घोट उन्हाळ्यामध्ये ग्राहकाला पाणी पिण्याची व्यवस्था केली, एखादा सामाजिक कार्यक्रम घेऊन समाज प्रबोधन केले, होतकरू गुणवंत विद्यार्थ्याला दत्तक मानून त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलला फक्त स्वतःला संरक्षण राहावे या उद्देशाने काही बाबी भेट स्वरूपात दिले असावे वसुली पथक येऊन गेल्यानंतर नेमके त्या पथकाने कोणते अकलेची तारे तोडले ग्राहकांना कळायला पाहिजे होते. मात्र ती माहिती का येत नाही पटलावर.” सगळं आहे घरी पण नितीमत्ता नाही बरी” अशी यांची वागणूक राहिली व येणाऱ्या काळात सुद्धा या पेक्षा गैराती असू शकते त्यामुळे सर्वसामान्य जनतेने आता काय ते ठरवून वागावे लागणार ज्या मल्टीस्टेट वाल्यांनी पैसे बुडवले ते फक्त तारखावर तारखा देत आहेत काही सुजाण व्यक्ती सकारात्मक भूमिका मांडायला पाहिजे अशा प्रकारचा वैश्विक सडा शिंपडत आहेत पण ग्राहकांनी इतरांनी सांगावे की आमची रक्कम आम्हाला परत मिळत आहे म्हणून, पण असे होताना दिसत नाही ज्यांची रक्कम आहे ते मुख्यालय जाऊन आले पण त्यांना लाभ झाला नाही हे त्यांनी सांगावे कामधंदे सोडून ते मुख्यालय जाऊन आले तो खर्च आणि वेळ वाया गेला पण हे सगळे सर्वच ग्राहक करू शकतात? सर्व साधारण ग्राहक मात्र मुख्यालय जाऊन दाद मागू शकत नाही असे असताना त्यांची बाजू झालेली आर्थिक लुबाडणूक लिखाणातून मांडायची नाही? परपोशा यंत्रणेने किंवा स्वतःच्या कमिशन पुरतच प्रामाणिकपणा ठेवावा?? ग्राहकाचे हीत जोपासले गेले पाहिजे या यंत्रणेला अंतर्गत बंडाळीची जाण असते पण ग्राहकाला सांगून कशाला स्वतःचे नुकसान ?? दहा किंवा पाच हजाराचे महत्त्व लुटारुकरांना नसेल ही रक्कम त्यांच्यासाठी किरकोळ असेल मात्र कष्टाने कमाविलेला एक छदाम आयत्या घबाडापेक्षा मौल्यवान असतो असं अब्राहम लिंकन यांनी सांगितलं म्हणून गुंतवणूकदारांचा टळ टळाट घेऊ नका अनेक होतकरू आरडी एजंटनी एजन्सी घेतली त्यांना वेळोवेळी ग्राहकांनी मदत केली त्यांनी सुद्धा एकएक पैसा जोडून आणि हजारोंची ठेव ठेवून परवाना काढला पण त्यांच्या ग्राहकांच्या पदरी निराशा आली. गेल्या अनेक दिवसांपासून आर डी एजंट म्हणून काम करणारे सुज्ञ व्यक्ती स्वतःसह ग्राहकाच्या हितास्तव राजीनामा देणार असल्याचे ऐकिवात आहे त्यामुळे एवढा जुना जाणता व्यक्ती या क्षेत्रात असताना राजीनामा देऊ शकतो याचा अर्थ त्या व्यक्तीला ते ठिकाण डबघाईला येऊन पोबारा करू शकते याची कुन कून लागली असावी?? त्यामुळे एक पतसंस्था,एक आर डी एजंट राजीनामा देणार ही गोंधळात्मक चर्चा थांबायला तयार नाही. कितीही मल्टीस्टेट वाल्यांनी “शीर “सागरात समुद्रात धुऊन आले तरी ग्राहकांच्या मनात त्यांची झालेली मलिन प्रतिमा सुधारित होईल का नाही हे येणारा काळच ठरवेल तसेच यावेळी ग्राहकांनी एक छदाम सुद्धा ठेव म्हणून दिलेली नाही त्यामुळे ही यंत्रणा केवळ दैनंदिन वसुली वरच टिकून असल्याचे कळते ठेवीदारांनी ठेव स्वरूपातील रक्कम देणे थांबविले असताना दिवसभर त्या चमचमणाऱ्या कार्यालयामध्ये फक्त काम करणारे चेले चपाटेच असल्याचं कळते ग्राहकाचा ओढा मात्र मंदावलेला दिसतो