
प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा
राजुरा तालुक्यातील भेदोडा गावातील प्रतिष्ठित नागरिक,कृषी केंद्राचे संचालक श्री.चंदू बिल्लावार, वय 55 यांचा गावाजवळील नाल्यावर आलेल्या पुरात आपल्या दुचाकी गाडीसह वाहून गेल्याने मृत्यू झाला. आज दुपारी 3 च्या सुमारुन ही दुर्दैवी घटना घडली.
गेल्या चोवीस तासांपासून अविरत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भेदोडा गावानजीक असलेल्या नाल्याच्या पुलावरून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत होता,त्याचवेळी वरूर गावाहून भेदोडा या त्यांच्या गावी जाण्यासाठी चंदू बिल्लावर यांनी आपली टुव्हील्लर पुलाहूंन जात असलेल्या पाण्यात टाकली परंतु पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने ते गाडीसहित वाहून गेले.
पोलीस प्रशासनाच्या अथक शोध मोहिमेनंतर त्यांचे प्रेत घटनास्थळापासून दोन किलोमीटरच्या अंतरावर मिळाले तर गाडी घटनास्थळीच आढळून आली.त्यांचे प्रेत शवविच्छेदनासाठी राजुऱ्याला नेण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले असा बराच मोठा आप्त परिवार आहे तर गावातील प्रतिष्ठित माणूस असा अचानक निघून गेल्याने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
