बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी वनमजूरावरही बिबट्याने केला हल्ला

बोर्डा झुल्लूरवार शेतशिवारातील घटना

पोंभुर्णा तालूका प्रतीनीधी:- आशिष नैताम


पोंभूर्णा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या देवाडा बिटातील बोर्डा झुल्लूरवार शेत शिवारातील सर्वे नंबर १७८ मध्ये शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेतकऱ्यांवर हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना दि. २७ आक्टोंबरला सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत वनविभागाला माहिती मिळताच तात्काळ वन अधिकारी ,वनकर्मचारी व पोंभूर्णा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जोशी सर यांनी आपली टिम घेऊन घटनास्थळी दाखल होऊन फटाके फोडून बिबट्याला पडवून लावण्याचा प्रयत्न करीत होते मात्र चवताळलेल्या बिबट्याने रोजंदारीवर काम करणाऱ्या वनमजूरावर हल्ला चढवून गंभीर जखमी केली असल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
काशिनाथ गावडे वय ५४ वर्ष रा.बोर्डा झुल्लूरवार व वनमजूर मनोज गद्देकार वय ४० वर्ष रा.देवाडा खुर्द असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.

बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी वनअधिकार्यांशी भ्रमणध्वणी वरुन जखमींच्या उपचारासंबंधी सूचना दिल्या तसेच सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा कु.अल्काताई आत्राम माजी सभापती पं. समीती पोंभूर्णा, जि.प.चे माजी सदस्य राहूलभाऊ संतोषवार, बंडू बुरांडे सरपंच जामखूर्द, राकेश गव्हारे घटनास्थळी दाखल झाले
दोन्ही जखमींना ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्राधिकारी फणिंद्र गादेवार यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी व त्यांची टीम करीत आहे.