
सहसंपादक -रामभाऊ भोयर
न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, येथील विद्यार्थ्यांकरिता वाढता उन्हाळा व शुद्ध पाण्याकरिता न्यू एज्युकेशन सोसायटी च्या सचिव डॉ. अर्चना धर्मे यांनी आपल्या आई व वडिलांच्या स्मृतीपिर्थ वॉटर फिल्टर भेट म्हणून दिले. यावेळी विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याचे महत्व आरोग्याच्या दृष्टीने कसे महत्वाचे आहे हे प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांनी पटवून दिले. तर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा. बी. के. धर्मे उपस्थित होते तर यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रा. जितेंद्र जवादे, उपमुख्याध्यापक विजय कचरे, पर्यवेक्षक सुरेश कोवे, शिफ्ट इन्चार्ज अरुण कामनापुरे तथा शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते तर यावेळी विद्यार्थ्यांना आता शाळेतच वॉटर फिल्टर उपलब्ध झाल्यामुळे शुद्ध व थंड पाणी पिण्यासाठी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते.
