
प्रतिनिधी: प्रवीण जोशी
ढाणकी
प्रत्येक पालकाला वाटत असते आपल्या वाटेला जे दुःख आले ते आपल्या मुलाच्या वाट्याला येऊ नये म्हणून अहोरात्र काबाड कष्ट करून आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना घडविण्याचा प्रयत्न असतो. म्हणून पालक अनेक महागड्या फी असलेल्या शाळेत मुलांना घालतात पण याच शाळा पालकाच्या भावनिकतेचा फायदा घेऊन कोरोनाच्या काळातही शुल्क कमी केली असे दाखवून शाळा पुन्हा सुरळीत चालू झाल्यानंतर त्यात प्रचंड प्रमाणात शुल्क वाढ केल्याची चर्चा सध्या पालकात आहे तेव्हा पालकांनी सर्व बाबीची चौकशी करून शुल्क भरणा करावा.
तसेच अनेक शाळांनी आपल्या परिसरात थोर समाजाला दिशा देणाऱ्या व्यक्तींचे नाव असलेल्या समाजाला नीती मूल्याची जाण करून देणाऱ्या व्यक्तींचे पुतळे उभे केले. पण त्यांचे विचार मात्र ना मुख्याध्यापकाने आत्मसात केले ना संस्थाचालकाने त्या विचारांची प्रतिपूर्ती केलेली दिसत नाही उलट कर्तव्यशून्यते मुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबीची हेळसांड होत असल्याची चर्चा पालक करता आहेत व लुटीचा व्यवसाय करणाऱ्या व दर्जाहीन शाळा किती दिवस टिकणार असा प्रश्न पालकांना पडतो आहे. तसेच एकदा अशा शाळांच्या डोलारा उभा केला म्हणजे पुन्हा पैसा वसुली करायचे काम असल्यामुळे यामध्ये अनेक डॉक्टर व कंत्राटदार गुंतले असून अशा शाळा म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरत आहे.
खासगी इंग्रजी शाळा आणि सीबीएससी शाळा यांच्या शुल्कात कोरोना काळात दहा टक्के सूट देण्यात आली पण आता शाळा नियमित सुरू झाल्या त्या शाळांनी यावर्षी त्या बाबीचे कारण सांगून 25 ते 30 टक्के वाढ करण्यास सुरुवात केलेली दिसते एकंदरीत सर्व विचार केला तर शाळांनी मागील वर्षीची भरपाई करायला सुरुवात केली का? असा प्रश्न पालकांना पडतो आहे तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या आदेशानुसार राज्य सरकारकडून सीबीएससी शाळेच्या शुल्क वाढीवर कागदोपत्री नियंत्रण आणण्यात आले. पण नियंत्रण फक्त कागदोपत्रीच असल्यामुळे शाळांच्या मनमानी कारभार संपलेला दिसत नाही.अशी जन चर्चा आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी जोडल्या गेलेल्या शाळांना राज्य शासनाची मान्यता घेण्याची कोणतीही बंधन नसल्याचं म्हणत शाळेच्या संस्थाचालकाने व मुख्याध्यापकाने फी वसुलीचा सपाटा लावला आहे. व आपल्या मनमानी कारभार करून लुटीचे साम्राज्य उभे केले असल्याचे परिसरात बोलल्या जात आहे. तेव्हा या लुटीच्या साम्राज्याला संबंधित प्रशासनाने आळा घालावा असे सर्वसामान्य पालकांना वाटत आहे.
