
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील पिंप्री दुर्ग येथे कृषी विभाग पंचायत समिती तथा सिंजेन्टा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिं.२५ स्पटेंबर २०२५ रोज गुरुवरला गुलाबी बोंडअळी नियंत्रण व कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत कृषी अधिकारी सौ. मनिषा पाटील ,पंचायत समिती राळेगाव यांनी गुलाबी बोंड अळी कीड ओळख, नुकसानीचे प्रकार व व्यवस्थापन पद्धती याबाबत तसेच कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची आवश्यक काळजी या संदर्भात ग्रामस्थांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सिजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे जिल्हा समन्वयक आशिष मोघे यांनी गुलाबी बोंड अळी सर्वेक्षणासाठी सर्व ग्रामस्थांना कामगंध सापळे मोफत पुरवठा करून त्यांच्या प्रभावी वापराबाबत मार्गदर्शन केले त्याचबरोबर गावचे पोलीस पाटील लक्ष्मण येडसकर यांनी मित्र किडी संदर्भात माहिती दिली
या कार्यशाळेला उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना सरपंच सौ सरिता ताई कोवे यांच्या हस्ते कामगंध सापळ्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी सदस्य कुणालभाऊ इंगोले, सदस्य मधुकर धुर्वे व आकाश चाफणे आदी सदस्यासह अनेक शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.
सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन श्यामलाल येडसकर(उमेद योजना, बीडीएसपी) यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुधांशु ठाकरे ,प.स.राळेगाव यांनी मानले.
