
सहसंपादक : रामभाऊ भोयर
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा पक्ष निरीक्षक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमरेड मतदार संघाचे आमदार मा. संजय मेश्राम यांची दिनांक 15/4/2025 रोजी ठिक रात्री 9.00 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीत पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची माहिती आमदार मेश्राम यांनी दिली. यामध्ये मा.सोनिया गांधी, राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या पक्षासंबधी सुचना कार्यकर्त्यांना दिल्या. सोबतच पक्षात राहून विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षात थारा देऊ नका सोबतच जे पक्ष सोडून जातात त्यांना जाऊ द्या आपण सर्वांनी आपल्या पक्षाच्या वतीने ग्राऊंड लेव्हलवरच्या कार्यकर्त्यापंर्यंत पोहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण आपल्या मतदारसंघात जरी पराभूत झालो असलो तरी मतदाराची टक्केवारी मात्र कमी झाली नसून वाढत असल्याने पक्षाचे मतदार कायमच असून उलट वाढले आहे. अशी माहिती सांगितली.सोबतच पक्ष संघटन आणखी मजबूत करण्यासाठी तालुका अध्यक्ष, युवक तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष अध्यक्ष यांना सुचना दिल्या.त्यावेळी या बैठकीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अँडव्होकेट प्रफुल्ल मानकर, अरविंद वाढोणकर, मिलिंद इंगोले राजेंद्र तेलंगे, प्रदीप ठुणे,धवल घुंगरूड नंदकुमार गांधी, अंकुश रोहणकार भरत पाल श्रावणसिंग वडते किरण निमट पुनेश्वर उईके जयप्रकाश रागिनवार रामुजी भोयर अंकुश मुनेश्वर केशवराव पडोळे अँड लौकिक आगलावे मनोज पेंदोर गजानन पाल राहूल होले अंकित कटारिया अशोक काचोळे निलेश रोठे रतन मांगुले प्रदीप लोहकरे मारोतराव पडाळ महादेव वाघाडे भरत ठुणे हमिदभाई पठाण शुभम चिडाम लोकेश गायकवाड श्रीधर थुटुरकर सज्जाद सैय्यद राजेंद्र नागतुरे अफसर अली मंगेश पिंपरे कमलेश गयलोत लियाकत अली मधूकर राजूरकर अँड वैभव पंडित सुनील भेले विनोद जयपूरकार राजू महाजन दिलीप दुधगिकर शशांक केंढे किशोर धामंदे संजय दांडेकर शरद पारिसे यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ही बैठक दिड तासांपर्यंत चालली.
