
सहसंपादक : रामभाऊ भोयर
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमात राळेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमनेर या शाळेने उल्लेखनीय कामगिरी करत तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला असून, शाळेला रु. २,००,०००/- चे रोख पारितोषिक नुकतेच प्राप्त झाले आहे.
या यशामध्ये शाळेतील शिक्षकांचा समर्पित सहभाग आणि विद्यार्थ्यांचा हर्षोल्हास यांचा मोठा वाटा आहे.
या यशामागे उपक्रमशील शिक्षिका शुभदा ज्ञानेश्वर येवले मॅडम यांचे नियोजन, कल्पकता आणि अथक परिश्रम यांचा मोलाचा वाटा आहे. शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप कामडी सर यांनी शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्यात समन्वय साधून प्रेरणादायी नेतृत्व दिले.
अंतरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख . लक्ष्मण ठाकरे सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन शाळेला लाभले. शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य तसेच शाळेतील मदतनीस पंकज भाऊ राऊत यांचा सहभाग यामुळे शाळेच्या सौंदर्यीकरण उपक्रमांना अधिक बळ मिळाले.
या उल्लेखनीय यशामुळे शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षिका व विदयार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
