
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
शहरातील शांतीनगर येथे राहणा-या
शांता बाई नान्हे यांच्या घराला शॉर्ट सर्किट ने आग लागली यात होत नव्हत सर्व जळून राख झाल दि.20 एप्रिल 2022 शांती नगरातील या घटनेने शांताबाई नान्हे हतबल झाल्या घराला आग लागल्याने घरातील संसार उपयोगी सामान जळून खाक झाले. शांताबाईना मदत केली पाहीजे हा हेतू ठेवून दि.23 एप्रिल2022ला
शांती नगर व बसस्थानक परिसरातील दुकानदारांनी
लोक वर्गणी करून नान्हे कुंटूबाला 5500 रुपयाची मदत केली .
संजय दूरबुडे,गणेश कुडमेथे, भानुदासजी आत्राम,गणपतराव ताटेवार, राजू वर्मा, अंकुश चामलाटे,जितेंद्र चोरडिया,प्रमोद अमृतकर,डॉ. जयस्वाल मॅडम,रुपेश जयंसिगकार,किशोर ढवळे, देवा महाजन,प्रकाश मडावी,
रोहित वर्मा,किसनाजी चव्हाण,किरण रोहनकार,शरद साखरकर, दिलीप झिटे, सोनू लस्सी वाले,जाकीर शेख, इ.लोकांनी
फुल नाही फुलाची पाकळी देवून मदत केली.
