के.बी.एच. माध्यमिक व आर बी.एच प्राथ. विद्यालय पवन नगर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा


महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित के . बी. एच. विद्यालय पवन नगर येथे भारताचा स्वातंत्र्य दिन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री उमेश देवरे सर यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाअंतर्गत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आर. एस. पी. , स्काऊट गाईड पथक, लेझीम पथक तसेच विविध राष्ट्रपुरुष देशभक्तांच्या पोशाखात विद्यार्थिनी समवेत स्वातंत्र्यदिनाच्या जयघोषात प्रभात फेरी काढण्यात आली.
त्यानंतर मा.श्री तुळशीराम भागवत व मा.श्री संतोष सोनपसारे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत झेंडागीत व महाराष्ट्रगीत गायन केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री कैलास खैरनार,श्री रमाकांत देसले,श्री बी. एल.श्रीवास्तव,श्री दिलीप तुपे, श्री मांगीलाल महाले, श्री विशाल डोके, श्री तुषार भागवतहे लाभले होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले . आर. एस. पी. व गाईडच्या पथकांनी शानदार संचलन करत राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
विद्यार्थ्यांनी लेझीम,देशभक्तीपर गीत गायन याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केले.प्रेक्षकांनी त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. आपल्या अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक श्री उमेश देवरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांचे व महापुरुषांचे स्मरण केले.
याप्रसंगी विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका युगंधरा देशमुख पर्यवेक्षक श्री प्रदीप हिरे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ संगीता काकळीस , बाल मंदिर विभागाच्या प्रमुख महाले मॅडम तिन्ही विभागाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षक पालक संघाचे पदाधिकारी व माता पालक संघाचे पदाधिकारी व शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संजय पवार यांनी केले तर आभार कविता सोनवणे यांनी मानले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.