लोडशेडिंग मुळे रात्रीच्या वेळेला शेत शिवारात पाणी देताना इलेक्ट्रिक शॉक लागून बिटरगाव( बु )येथील शेतकऱ्याचा मृत्यू

प्रतिनिधी : बिटरगांव ( बु)शेख रमजान

बिटरगाव ( बु ) येथील सदन शेतकरी भीमराव प्रकाश गंगासागर हॆ दि,7,1,2024 रोज रविवारी रात्री दहाच्या दरम्यान शेतामध्ये शेत पिकांना पाणी देण्याकरिता गेले होते.परंतु सकाळी शेजारी असलेल्या शेतकऱ्यांना भीमराव गंगासागर हे मृत अवस्थेत दिसल्याने ताबडतोब पोलीस स्टेशन बिटरगाव ला कळविण्यात आले होते. त्यानंतर वीज उपकेंद्र कार्यालय बिटरगाव च्या अधिकाऱ्यांना व स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी यांना सुद्धा कळविण्यात आले होते.प्रत्येक डिपार्टमेंटचे अधिकारी घटनास्थळी आले व पंचनामा करून इलेक्ट्रिक शॉक मुळे शेतकरी भीमराव प्रकाश गंगासागर यांचा मृत्यू झाला असे सांगण्यात आले होते. त्यानंतर पोस्टमार्टम साठी मृतदेह ढाणकि येथे देण्यात आले होते. तेथील ढाणकी आरोग्य विभाग प्रमुख मुनेश्वर मॅडम यांनी इलेक्ट्रिक शॉक मुळे मृत्यू झाला असे सांगण्यात आले होते.दि,8,1,2024 रोजी सोमवारी शेतकऱ्याच्या बॉडीचा पोस्टमार्टम झाल्यानंतर दुपारी दोन वाजता हिंदू स्मशान भूमी बिटरगाव (बु) येथे त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला. बिटरगाव ( बु ) हे गाव ग्रामीण बंदी भागात असल्यामुळे शेतकऱ्यांना शेत पिकांना पाणी देण्याकरिता रात्रीच्या वेळेस विद्युत थ्री फेज लाईन दिली जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या जीवाची तमा न बाळगता शेतशिवारामध्ये रात्रीच्या वेळेस पाणी देण्याकरिता जातात. कोणता शेतकरी सर्पदंशा नि मृत्युमुखी पडतो तर कोणता शेतकरी विजेच्या शॉक मुळे मृत्युमुखी पडतो. त्यातीलच आजचा अजून हा एक प्रकार बिटरगाव येथील सदन शेतकरी भीमा गंगासागर हा कुटुंब प्रमुख असून पत्नी व एक मुलगी असा परिवार या परिवाराचा कर्ताहर्ता शासनाच्या गैर जिम्मेदारीमुळे मृत्यूमुखी पडला आहे त्यामुळे संपूर्ण गावकरी शोकाकुल करत आहेत.मृतक शेतकऱ्यांचे वय अंदाजे चाळीस वर्षे असल्यामुळे त्यांच्या पश्चात परिवाराचे लालन पालन कसे होईल…? त्यांच्या पत्नीचा आधार निघून गेल्यामुळे जीवन कसे जगणार,,? एकुलत्या एका मुलीचे शिक्षण होईल की नाही,,? असे अनेक प्रश्न गावकऱ्यासमोर उभे राहिले होते.
प्रत्येक वेळेस शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे निष्पाप शेतकऱ्याचा बळी जातो. शेतकऱ्यांना आपल्या शेतीतील पीक जोपासण्यासाठी वन्य प्राण्याचा त्रास…! शेतकऱ्यांना डुप्लिकेट खत,बियाणे, कीटकनाशक विकणाऱ्या कृषी केंद्र वाल्या लुटारू दलालांचा त्रास..
शेतमाल विक्रीसाठी नेले असता काटा, धारा, कट्टी हमाली व कमी भावात माल घेणाऱ्या भुसार व्यापाऱ्याचा त्रास. व लोड शेडिंग थ्री फेज रात्रीच्या वेळेस देऊन शेतकऱ्यांना मरण यात्ना देणाऱ्या ग्रामीण विद्युत कार्यालयाचा त्रास.. हे सर्व त्रास सहन करून शेतकरी दिवस रात्र राबराब कष्ट करून मरणाला न घाबरता आपल्या परिवाराची व देशाची नित्यनेमाने सेवा करतो. पण शेतकऱ्याची कीव अजूनही कोणाला आली नाही. आखरी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी अशा दुर्दैवी अपघाताला सामोर जाऊन मरण पतकरावे लागत आहे. करिता प्रशासनाच्या संबंधित विभागाने भीमराव गंगासागरच्या परिवाराला शासकीय आधार द्यावा व लोड सीटिंग बंद करून 24 तास विद्युत पुरवठा द्यावा म्हणणे गावकऱ्यांचे होते…